महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांचे पुन्हा शिक्षण आयुक्त, पुणे यांना निवेदन सादर!
छत्रपती संभाजीनगर (शालेय वृत्तसेवा) :
DCPS/NPS खाते नसलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी मा. सूरज मांढरे साहेब (शिक्षण आयुक्त) पुणे यांना ईमेल अणि व्हॉट्सअँपद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजपर्यंत DCPS/NPS खाते नसलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आजतागायत एकही हप्ता देण्यात आलेला नाही. मा.शिक्षण आयुक्त, पुणे त्यांना यथानियमन कार्यवाही करून सर्व DCPS NPS खाते नसलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने देण्यात यावी ही विनंती. दिनांक 13 जून 2022 ला शिक्षण आयुक्त कार्यालयाने याबाबत पत्र काढलेले होते त्या पत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे स्पष्ट दिसून येते. मा. शिक्षण संचालक प्राथमिक यांना वारंवार निवेदन देऊनही आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
कालच्या शासन निर्णयाप्रमाणे 5 वा हप्ता देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. DCPS/NPS खाते नसलेल्या शिक्षकांना आतापर्यंत एक ही हप्ता देण्यात आलेला नाही. तरी आपण स्वतः लक्ष घालून हे प्रकरण निकाली काढण्यात यावे. तसेच राज्यातील सर्व DCPS /NPS खाते नसलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. निवेदनाची एक प्रत विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनाही देण्यात आलेली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .