इस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा निकाल 96 टक्के : दहावीतील यशाची परंपरा कायम !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मार्च 2025 मध्ये दहावी बोर्ड परिक्षेत किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या  विद्यार्थ्यांनी बाजी मारली. शाळेचा निकाल 96.07 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे 100% मुलिनी बाजी मारून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 

         शाळेत सर्व प्रथम - कु. दिपा दत्ता विनकरे 91.60 %  द्वितीय - अनुस्का भारत भोयर 89.80 % आणि शशिकांत गायकवाड 89.80 % तृतीय - स्नेहा शंकर पवार 89.20 % आणि उमा संजय वानखेडे 89.20 % मिळाले तर विशेष प्राणिग्य मिळालेले विद्यार्थी - 21 तर प्रथम श्रेणीत - 07 आणि द्वितिय श्रेणीत - 8 विद्यार्थी. तृतीय श्रेणी 5 या प्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावी परीक्षा केंद्रातून जि.प.हा. इस्लापूर ला द्वितीय स्थान मिळाले आहे.

       उत्कृष्ट निकालाबदल शालेय व्यवस्थापन समिती इस्लापूर, ग्रामपंचायत इस्लापूर,  शाळा सुधार समितीचे पदाधिकारी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक पाटील जी.जी., तथा शिक्षकवृंद श्री राजापूर सर, जाधव सर, मैसनवाड सर, मठपती मॅम, हजारे सर, आदिंचे  मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)