उन्हाळा आला ,तब्येत सांभाळा
टोपी,गॉगल,स्कार्फ वापरणे इत्यादी नेहमीच्या सूचना आहेतच.
काही महत्वाच्या सूचना
कुठल्याही शहरात होणारा दुधाचा पुरवठा,त्याचा वापर हे ठरलेलं असतय, फार मोठा बदल त्यात होत नाही ,त्यात उन्हाळा आला कि दूधाच प्रमाण कमी होतय अशावेळी शहरात थंडगार मसाला ताक मिळेल म्हणून दुकान थाटली जातात.
शक्यतो घरगुती ताक प्या नाहीतर लिंबू सरबत ,उसाचा रस बेस्ट.
२.बर्फगोळा खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही पण आपल्याकड औद्योगिक वापरासाठी असलेला बर्फ सरसकट खाण्याला वापरला जातो , बर्फ बनवताना वापरलेल्या पाण्याची शुद्धता ह्याबद्दल कुठलीही तपास यंत्रणा अस्तित्वात नाहीये.
फ्रीजमध्ये तयार केलेला बर्फ असेल ,खात्रीशीर दुकान असेल तरच बर्फ खाण्याचा प्रयोग करा अन्यथा आजाराला बळी पडायला तयार राहा.
३.वेगवेगळ्या शाळा ,संस्था ह्यांची उन्हाळी शिबीर सगळ्यांना सोयीची असतात, पोर अडकून पडतात,आईबापाला सुट्टी कशी घालवावी ह्याचा घोर राहत नाही.
मात्र ह्या शिबिरात पोरांना मैदानी खेळ आणि कला शिकवल्या जात असतील तर हरकत नाही, मात्र पोरांची डोकी ओल्या मातीचे गोळे असतात, ह्या वयात जर धार्मिक विद्वेषी विचारांची बौद्धिक कानी पडली आणि डोक्यात आपली महान संस्कृती आणि धर्म इत्यादीच वार भरल तर नंतर ती भूत उतरवायला जड जातय.
त्यामुळे आपल्या लेकरांना कुठल्या शिबिरात पाठवतोय त्याची खात्री करा.
अशा रीतीने शारिरीक आणि बौद्धिक अशी दोन्ही प्रकारे तब्येत सांभाळा.
#जनहितार्थ_जारी
Anand Shitole
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .