विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आई-वडिलांचे नाव कमवावे - विद्या श्रीमेवार

शालेयवृत्त सेवा
0

 


लोणीच्या सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे एक मे महाराष्ट्र दिनी सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी विद्या श्रीमेवार बोलत होत्या. प्राथमिक शिक्षण घेऊन तुम्ही माध्यमिक शाळेत प्रवेश करित आहात. तेथे अभ्यासक्रम वेगळा, विषय वेगळा, शिक्षक आणि मित्र ही नवे असणार आहे. अशा वातावरणात सहभागी होऊन स्वतःच वेगळ अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. यशवंत व्हा. आई -वडिलांचे नाव कमवा. अशा शुभेच्छा दिल्या.

एक मे महाराष्ट्र दिनी प्रभात वेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोणीच्या सरपंच बेबीताई कुरसंगे, ग्रामसेविका वर्षा कांबळे, उपस्थित होते. विषय शिक्षक अंकुश राऊत, विद्या श्रीमेवार, मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

सातवीचे विद्यार्थी प्रतिक गुंजकर, निशांत खरे, पूर्वी धुर्वे, समृदा बादड, रूपाली पवार, ज्योती कोसरे,  तेजश्री काळे या विद्यार्थ्याने शाळेबदल आणि शिक्षकाबदल मनोगत व्यक्त केले. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भेटवस्तू दिली तर शाळेकडून त्यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाला हणमंत गुंजकर, एकनाथ बादड, अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदाताई सावरकर, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, गावकरी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)