नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 8वी NMMS परीक्षेत दैदीप्यमान निकालाची परंपरा जि.प.हायस्कुल जवळगाव ता.हिमायतनगर जि.नांदेड ने कायम राखली आहे.
सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 8वी च्या NMMS परीक्षेसाठी 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 15 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा परिषदेतर्फे लवकरच जाहीर होणाऱ्या निवडयादीतही यातील अनेक विद्यार्थी झळकतील.या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक 12000/- रुपये NMMS शिष्यवृत्ती किंवा वार्षिक 9600/- सारथी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.
अस्मिता शंकर बंडे,वेदांत बंडू माने,सोहम अरविंद पवार,युवराज संतोषसिंह ठाकूर,कार्तिक राजेश पटणे, आदित्य संतोष पवार,कृष्णा दत्ता रावते,आकांक्षा संतोष पवार, समीक्षा बालाजी पवार,पूजा प्रभाकर कुऱ्हाडे,संजीवनी दिगांबर पवार,प्रियंका शेषेराव पावडे,स्वाती कानबा वाघमारे, अनुष्का सीताराम वऱ्हाडे, सोनाली समाधान बोईनवाड हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा.माधवराव पाटील जवळगावकर साहेब तसेच ग्रामपंचायत जवळगाव यांनी यावर्षी इयत्ता 5वी व 8वी वर्गांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देऊन मोलाचे सहकार्य केले होते.त्याचाही विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक,विद्यार्थी,पालक, शिक्षक व कर्मचारी वृंद,ग्रामपंचायत,युनिक कोचिंग क्लासेस यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .