नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):
शाळेची गुणवत्ता ही शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नाचे फळ असते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थी हितासाठी अहर्निश प्रयत्न केले की शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता प्राप्त करू शकते असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे . ते नांदेड मधील वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
विनोद निळकंठराव पावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा वार्षिक महोत्सव संपन्न झाला. पुढे बोलताना माजी शिक्षण संचालकांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तराची गुणवत्ता धारण करणारा तयार व्हावा ही शिक्षकांकडून अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रम पिठावर शाळेचे मुख्य सल्लागार निळकंठराव मोहनराव पावडे , वर्षा विशाल पावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी टि व्ही चलापतीराव , प्राचार्य सतीश शिरसाट, उपप्राचार्य रमेश राचुरे आदी उपस्थित होते. प्रारंभी विनोद पावडे यांनी पाहुण्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश शिरसाट यांनी केले. गेल्या वर्षभरातील शाळेने केलेल्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचा त्यांनी धावता आढावा घेतला. उपप्राचार्य रमेश राचूरे यांनी शाळेच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा सादर केला. या प्रसंगी असाधारण कर्तृत्व साध्य केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिष्यवृती परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा ही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या असाधारण कला गुणांच्या सादरीकरणाचा अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष विनोद पावडे यांनी पालक, शिक्षक आणि प्रमुख पहुण्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रमेश रचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोदभाऊ पावडे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .