शैक्षणिक सहलीने विद्यार्थांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात..

शालेयवृत्त सेवा
0

 




लोणी जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक लोणी शाळेची शैक्षणिक सहल माता -पालक यांच्या संमतीने आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने महामंडळाच्या ( ST ) गाडीने ९ तारखेला मंगळवारी नागपूर येथे गेली होती. तेथील विविध ठिकाणे पाहण्यात विद्यार्थी दंग आणि आनंददित झालीत. अशा शैक्षणिक सहलिमुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात यात शंका नाही.


विद्यार्थांनी काय पाहिल ?

सेवाग्राम ( वर्धा ) : म.गांधी कुटी आणि परिसर

नागूपर : रमन सायन्स सेंटर ( तारांगन आकाशातील घडामोडी / ग्रहाची माहिती / थ्री डी पिक्चर ), प्राणी संग्राहलय ( वाघ जवळून पाहता आला / अस्वल / बिबट्या / हरीन /माकडं / विविध पक्षी आणि प्राणी ), मेट्रो सफर ( एक वेगळीच मजा होती ), क्रिकेट स्टेडियम ( माहिती मिळाली ), दीक्षाभूमी ( ऐतिहासिक स्थळ ), विमानतळ ( जवळून विमान पाहता आले ).

        गावकरी आणि पालकांनी गाडी निघतांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छामुळे शिक्षक भारावले हे विशेष ! सहली दरम्यान मुले - मुली चांगले राहिले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोणताही त्रास झाला नाही. 

    सहलीचे सुंदर नियोजन करणारे सहल प्रमुख श्री. अंकुश राऊत, मुलिंची विशेष काळजी घेणारी श्रीमती विद्या श्रीमेवार, ड्रायव्हर जवळ बसून त्यांच्या कडे लक्ष देणारे श्री. राहूल तामगाडगे, मदतनिस सौ.जयश्रीबाई बादड आणि मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)