जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये अल अमीन मराठी शाळेतील सौ.अस्मा अमजदखान नदाफ -मुल्ला यांचा द्वितीय क्रमांक

शालेयवृत्त सेवा
0

 


सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये अल अमीन मराठी शाळेतील सौ.अस्मा अमजदखान नदाफ / मुल्ला यांचा द्वितीय क्रमांक आल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

              महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (विद्या परिषद पुणे) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धा - 2023-24 पुणे विभागीय पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आली. यामध्ये सौ अस्मा अमजदखान नदाफ/ मुल्ला , सहाय्यक शिक्षिका अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली यांच्या Maths ID cards नाविन्यपूर्ण उपक्रमास द्वितीय क्रमांक जाहीर केला.

   प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांनी निकाल प्रसिध्द केला. संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक ,शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले .

               या नवोपक्रमास  संस्थेचे अध्यक्ष मा. श्री एफ एम.आकिवाटे ,संस्थेचे सचिव हाजी मा. श्री हारून रशीद मुल्ला , संस्थेचे सदस्य मा. श्री सरवर मुल्ला सर व मा. श्री. ताहेर मुल्ला सर,  मुख्याध्यापिका सौ.नसीम पिरजादे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)