राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाची मराठवाडा विभागीय कार्यकारणी जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



विभागीय अध्यक्षपदी बबन जाधव तर सरचिटणीसपदी महादेव खळुरे 

छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची बैठक राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन राज्यसरचिटणीस अनंता जाधव ,राज्य संपर्कप्रमुख गजानन देशमुख, नागपुर विभागीय सरचिटणीस बळीराम चापले,चंद्रकांत गायकवाड,गजानन सुर्यवंशी,यासह आदि उपस्थित होते.

       यावेळी छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागाची कार्यकारणी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी जाहिर केली .यामध्ये मराठवाडा विभागीय अध्यक्ष -बबन जाधव सरचिटणीस- महादेव खळुरे , कार्याध्यक्ष-सोमनाथ वाळके , कोषाध्यक्ष - अशोक सुरवशे उपाध्यक्ष -विक्रम पाचंगे ,अरुण अतनुरे , सल्लागार -चंद्रकांत गायकवाड ,गजानन सुर्यवंशी . मराठवाडा प्रवक्ता -शिवा कांबळे , संपर्कप्रमुख -संभाजी आलेवाड महिला प्रतिनिधी -रेणुका देशपांडे,उषा माने ,अनिता गर्जे ,संघटक-एकनाथ मुळे, रामेश्वर अंबेकर,काझी एस .एस ,मार्गदर्शक -डाॅ संतोष भोसले, संजय गायकवाड अशा प्रकारे विभागीय कार्यकारणी निवड करून जाहिर करण्यात आली .निवड झालेल्या पदाधिकारी यांचा राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

         राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी निवड झालेल्या पदाधिकारी यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे कार्य जिल्ह्यातील व विभागातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम विभागीय कार्यकारणी ने करून संघटनेची सभासद संख्या वाढविणे व सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय संचालक , विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा करून राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे ,संघटनेचे पद केवळ लेटर पॅड पुरते न राहता  संघटनशक्ती वाढविण्यासाठी पदाधिका-यांनी तोंडांत साखर ,डोक्यावर बर्फ तर पायाला भिंगरी या प्रमाणे कार्य करावे  संघटनेसाठी वेळ व आर्थिक बळ देण्याचे काम पदाधिकारी यांनी केले तरच संघटनशक्ती वाढणार आहे त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी यांनी काम करणे ,असे मार्गदर्शन निवड झालेल्या पदाधिकारी यांना केले. 

            बैठक यशस्वीतेसाठी सुनिल ढाकरके, सुशीलकुमार पांचाळ, पांडुरंग गिरी, प्रा.युवराजबी राठोड, निलेश जोशी,कौतिकराव जंजाळ,अशोक खरात ,अनिता जोगदंड,सिद्दीकी महमंद इरफान, शामसुंदर घाडगे,गणेश स्वामी रावसाहेब भोसले, शिवाजी चव्हाण,सुरेश शिंगणे रविंद्र आहेर , यासह आदिनी परिश्रम घेतले ,बैठकिचे सुत्रसंचन‌ शिवाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव चव्हाण यांनी मानले नवनियुक्त पदाधिकारी व विभागीय अध्यक्ष यांनी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे कार्य तनमन धनाने करून मराठवाडा विभागीय कार्यकारणी ससभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असे उपस्थित सभासदांना आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)