जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदाची शिकवण अंगीकारा -मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांचे आवाहन

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

हिंदवी स्वराज्याच्या प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांचे संस्कार आणि या देशाला घडविणाऱ्या आधुनिक भारतातील विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचे आजच्या पिढीने अवलोकन करण्याची गरज आहे.असे मत मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी व्यक्त केले आहे.

        शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमात ते विद्यार्थी आणि उपस्थितीशी बोलत होते. यावेळी शाळेतील शिक्षक माधव नामवाड दिगंबर कल्याणकर शोभा किडे संध्या सिंदगीकर सूर्यकांत जाधव बालाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

           संयुक्त जयंती सोहळ्यात बोलताना मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी राजमाता जिजाऊ यांनी बाल शिवबा यांच्यावर कशा पद्धतीने संस्कार केले? हिंदवी स्वराज्याचे धडे कसे दिले? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची भक्कम पायाभरणी कशी केली? याबाबत माहिती दिली.

          स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले की भारताच्या वसुवैद्य कुटुंबकमची भावना जगभर पसरण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिधित्व करताना आपल्या देशाच्या विशाल संस्कृतीचे प्रदर्शन घडविले. भारतात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सतीप्रथा बंदी कायद्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे भविष्यातील भारत घडवण्यासाठी मा जिजाऊंच्या संस्काराची आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किडे शोभा यांनी केले व आभार प्रदर्शन श्री कल्याणकर दिगंबर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)