विश्वस्तरीय लेखन स्पर्धेत गझलकार चंद्रकांत कदम यांना पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेद्वारा आयोजित दहाव्या विश्वस्तरीय लेखनस्पर्धेत यावर्षी "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" हा विषय देण्यात आला होता. नांदेड येथील जिल्हा परिषद शिक्षक तथा सुप्रसिद्ध गझलकार चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र) यांच्या "एल्गार" या गझलेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.

       सदरील स्पर्धेत चंद्रकांत कदम यांची गझल सलग तिसऱ्यांदा पुरस्कारप्राप्त ठरली आहे. ते जिल्हा परिषद शिक्षक असून "समतेच्या डोहाकाठी" हा त्यांचा मराठी गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)