जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगीचा विद्यार्थी झाला क्लास वन ऑफिसर

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

    मौजे वांगी येथील विद्यार्थी नितीन साहेबराव जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या झालेल्या परीक्षेमध्ये देदीप्यमान यश संपादन करून पशुसंवर्धन व पशु वैद्यकीय अधिकारी श्रेणी एक या पदावर नियुक्ती होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. वांगी गावातून श्रेणी एकचे अधिकारी होणारे हे पहिलेच वांगी शाळेचे  विद्यार्थी आहेत. 

       वांगीचे तत्कालीन मुख्याध्यापक अजित कदम सरांनी सुरुवातीपासून  स्पर्धा परीक्षेचे धडे देत नितीनला स्पर्धा परीक्षा आणि  वैद्यकीय क्षेत्राबद्दल अनमोल   मार्गदर्शन केले होते व नितीनचा पाया अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी भक्कम केला होता. नंतर नितीनची अतिशय बेताची परिस्थिती असूनदेखील त्या परिस्थितीवर मात करून नितीनने वैद्यकीय क्षेत्र निवडले आणि अफाट मेहनतीच्या आणि स्वतःच्या विश्वासावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून पशुसंवर्धन व पशु वैद्यकीय अधिकारीश्रेणी  1 या पदावर नियुक्ती मिळवली. आणि वांगीच्या वैभवामध्ये भर पाडली त्या निमित्ताने आज गावकरी व शाळेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नितीनचा यथोचित सन्मान करून शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 

      याप्रसंगी सदर कार्यक्रमास वांगी येथील सरपंच श्री. दत्ताभाऊ जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल जाधव ,आनंदा जाधव, गंगाधर जाधव, दिगंबर जाधव, अंकुश जाधव, विजय तारू, व्यंकटी तारू, गणेश जाधव, सुधीर जाधव, सतीश जाधव, अंकुश जाधव, लखन जाधव ,गणेश जाधव, सचिन जोगदंड तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ टापरे, माजी मुख्याध्यापक अजित कदम, उपक्रमशील शिक्षक सारंग स्वामी, अरुण वर्ने, शाळेतील विद्यार्थी व गावकरी  मंडळी उपस्थित होते.

नितीनच्या या यशाबद्दल वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी नितीनचे आणि शाळेचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)