लोणी जिल्हा परिषद शाळेत 'बालसभा' संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातिल कमठाला संकुलातंर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्ताने ' बालसभा' घेण्यात आली. यावेळी गुरु - शिष्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

बाल सभेच्या अध्यक्षस्थानी शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री प्रतीक गुंजकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार तर प्रमुख वक्ते म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर होते. कार्यक्रमाची सुरुवात फुले आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेतील विद्यार्थीनीं पूर्वी धुर्वे, पायल वाघमारे, मारुती मेडलकर, ज्योती कोसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मंत्रा गुंजकर तर आभार योगेश सावरकर या विद्यार्थ्याने मानले.

गुरु -शिष्य स्मृती दिनानिमित्त झालेल्या बालसभेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले होते. रांगोळी, पुष्पगुच्छ, पुष्पहार, बसण्याची व्यवस्था, ध्वनीक्षेपण अशा विविध प्रकारची जबाबदारी सांभाळून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्या बद्दल शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)