वांगीच्या शाळेत शेतकऱ्यांचा सन्मान

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृतसेवा ) :

कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'बाप' या कवितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथे झालेला राष्ट्रीय किसान दिनानिमित्त सन्मान आदर्श शेतकऱ्यांचा. आज दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथे राष्ट्रीय किसान दिनानिमित्त गावातील आदर्श शेतकऱ्यांचा बळीराजांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. 

याप्रसंगी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर आदर्श शेतकऱ्यांच्या व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले तर नंतर शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक श्री. पंढरीनाथ टापरे, उपक्रमशील शिक्षक अजित कदम, सारंग स्वामी, अरुण कुमार वरणे यांनी सर्व शेतकऱ्यांचा  पुष्पहार व पुष्प देऊन त्यांचे सन्मान केला. व पंढरीनाथ टापरे व अजित कदम यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे मत व्यक्त केले. तर  सारंग स्वामी यांनी कवी इंद्रजीत भालेराव यांच्या बाप या कवितेचे गायन करून शेतकऱ्यांच्या  कार्याचे स्मरण करून दिले. 

याप्रसंगी चेअरमन चांदू जाधव,बाबू जाधव निर्गुण जाधव ,प्रसाद जाधव,शिवानंद जाधव दिगंबर जाधव, कोंडीबा जाधव, बालाजी जाधव,  आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)