शिक्षक रक्तदात्यांनी शतकपूर्ती करून समाजापुढे ठेवला मानव सेवेचा अनोखा आदर्श

शालेयवृत्त सेवा
0

 


धुळे ( शालेय वृत्तसेवा ) :

साक्री तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी धुळे जिल्ह्यात  रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा पाहता माननीय जिल्हाधिकारी अभिनव गोयल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम जी गुप्ता तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय चंद्रकांत जी पवार साहेब व शिक्षणाधिकारी भाऊसाहेब आकलाडे यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याबाबत केलेल्या मागील आठवड्यातील आवाहन शिक्षकांचे गुणवत्ता विकास प्रशिक्षण स्थळीच सुमारे 100 प्राथमिक शिक्षकांनी केले रक्तदान करत समाजापुढे आदर्श ठेवला.

      धुळे जिल्ह्यात साक्री/पिंपळनेर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांचे गुणवत्ता विकास प्रशिक्षण स्थळी म्हणजेच शांतीवन डी.एड. कॉलेज साक्री येथे 34 प्राथमिक शिक्षक रक्तदात्यांनी व वि.ज.भ.ज.आश्रमशाळा, पिंपळनेर येथे 66 प्राथमिक शिक्षक रक्तदात्यांनी दि. 23 डिसेंबर 2023 रोजी शनिवारी रक्तदान शिबिर प्राथमिक शिक्षक समन्वय समिती व शिक्षण विभाग पंचायत समिती साक्री मार्फत आयोजित केलेले होते. सदर रक्तदान शिबिरात शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

          प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र नांद्रे यांनी प्रशिक्षण स्थळी व रक्तदान चळवळ या प्राथमिक शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांना जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याबाबत आवाहन केलेले होते तसेच साक्री शिक्षण विभाग पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्रजी पगारे व विस्तार अधिकारी विजय पवार, केंद्रप्रमुख श्री वासुदेव सोनवणे, श्री सुनील चव्हाण, श्री एन एल पाटील,प्राथमिक शिक्षक पतपेढी चे संचालक, परिषदेचे श्री संदीप नेरे तसेच प्रशिक्षण सुलभक विनोद भामरे, योगेश्वर निक्वाडे, नितीन शिंदे, संदीप नांद्रे, नरेंद्र खैरनार या सुलभकांबरोबर अधिकाऱ्यांनी देखील शिक्षकांना प्रोत्साहित केलेले होते या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन साक्री व पिंपळनेर परिसरातील तब्बल 100 शिक्षकांनी रक्तदान केले.

         तसेच या रक्तदान शिबिरातील विशेष बाब म्हणजे शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार यांच्यासह इतर अधिकारी वर्गांनी देखील स्वयंस्फूर्त रक्तदान केले , तसेच महिला शिक्षकां पैकी प्रथमच श्रीमती प्रतिभा साळुंखे मॅडम, श्रीमती भामरे श्रीमती सिंधुबाई अहिरे मॅडम, श्रीमती पियुषा पाटील मॅडम शेवाळे मॅडम श्रीमती पाटील मॅडम व इतर 28 महिला भगिनी यांनी देखील स्वयंत्स्फूर्त रक्तदान केले व पुरुष शिक्षकांमध्ये सुनील जाधव संदीप नेरे, निलेश ठोके, तुषार गर्दे, अनिल गांगुर्डे, प्रशांत पाटील, वाल्मीक वकारे, समाधान पाटील, रूपा गांगुर्डे, वैभव देवरे ,बापू बहिरम,, दत्ता मद्ये, सावता बोरसे, नवनाथ सोले, प्रद्युम्न गुंडूरे व इतर 72 शिक्षकांनी देखील रक्तदान करत समाजापुढे रक्तदानाचा आदर्श घालून दिला.

       या रक्तदान शिबिर कामी धुळे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयची रक्तपेढी विभागाच्या तज्ञ डॉक्टर , पॅथॉलॉजिस्ट पी आर ओ व ब्रदर त्याचबरोबर निलेश सुराणा टिमचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)