नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
एम.पी.एस.पी.व यु.पी.एस.सी. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेचा पाया पक्का व्हावा म्हणून इ.5वी तथा इ.8वी वर्गांच्या शिष्यवृत्ती परीक्षेस महत्त्व दिले जाते. सदरील परीक्षेत नांदेड जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यंदा 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी सदरील परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आँनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता 1 सप्टेंबर ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत देण्यात आली होती, परंतु नांदेड जिल्ह्यात सदरील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे आँनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया शाळेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा लक्षणीयरित्या अत्यंत कमी करण्यात आली आहे. सदरील बाब शैक्षणिकदृष्टया अत्यंत गंभीर आहे तसेच नांदेड जिल्ह्याबाबत चिंता वाढवणारी आहे.
यास्तव परीक्षा परिषदेने विद्यार्थी आँनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता वाढीव दि. 15 डिसेंबर 2023 पर्यंत द्वितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेवून संबंधित सर्व मुख्याध्यापकांनी तात्काळ उर्वरित जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्याचे आवाहन डॉ सविता बिरगे,शिक्षणाधिकारी प्रा. यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .