कल्याण ( शालेय वृत्तसेवा ) :
विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण केले पाहिजे असे उद्गार सोनारपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. हर्षल खंबायत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना काढले. जिल्हा परिषद शाळा-गोळवली तेथे क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामरिनिर्वाण अभिवादन सभेत काढले.
यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपैलू उलघडताना सांगितले की, ज्ञानाची अफाट भूख बाबासाहेबांना होती. त्यांच्या जीवनकार्यावर बोलण्यासाठी संपूर्ण दिवसही कमी पडेल. यावेळी सोनारपाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री शाम मोराणकर यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वतेचे प्रतीक आहेत. आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावरच त्यांनी जगात श्रेष्ठ असे भारताचे संविधान आपल्याला दिले. यावेळी वरिष्ठ विषयतज्ज्ञ श्री. शिरोळे सर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षणप्रेमी श्री रामा म्हात्रे काका, समिती सदस्य सौ.जाधव इ. उपस्थित होते.
शाळा सुधार समीती सचिव सौ.कल्पनाताई पाटील व सौ.मनिषाताई पाटील यांनी चहा नाश्ताची सोय केली. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका श्रीमती योगिता बोरकर यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रकला व निबंध स्पर्धांची जबाबदारी पार पाडली. शाळेतील विद्यार्थी प्रणव जाधव आणि बधूंनी आपल्या सुरेल आवाजात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गीतातून अभिवादन केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नटराज मोरे सर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .