सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच सरोवर शिक्षण मंडळ सांगली या संस्थेत रोबोटिक लॅब सुरू..

शालेयवृत्त सेवा
0



सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
नवीन तंत्रज्ञान घेऊन हाती भावी पिढीची करू प्रगती विद्यार्थ्याच्या भावी प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सहजतेने करण्यासाठी रोबोटिक लॅब उद्घाटन सरोवर शिक्षण मंडळ साऊथ सांगली या संस्थेच्या शाळांमध्ये  करण्यात आले.रोबोटिक लॅबच्या उद्घाटनासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री रंगराव आठवले साहेब जे जे मगदूम इंजीनियरिंग कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल गजाला सय्यद मॅडम व निर्भया पथक चे खोत मॅडम अमित जाधव व सविता कसबे मॅडम इत्यादींचे प्रमुख उपस्थितीत् उद्घाटन करण्यात आले.
         पालक सभेचे औचित्य  साधून रोबोटिक लॅबचे उद्घाटन केले त्याचबरोबर रोबोटिक लॅब  ची संकल्पना शाळेतील सहाय्यक शिक्षिका नाविन्य उपक्रमशील सौ आसमा अमजद खान नदाफ या मॅडमनी या लॅब ची संकल्पना मांडली.कार्यक्रमा साठी लाभलेले पाहुण्यांचे स्वागत माध्यमिक प्रशालेत चे मुख्याध्यापक श्री कुरणे सरांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एफ एम अकिवाटे यांनी केले त्याचबरोबर संस्थेचे सचिव माननीय श्री सरवर मुल्ला यांनी  पालकांचे उद्बोधन केले.
           या पालक सभेमध्ये पालकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम I Wish. .. हा उपक्रम घेण्यात आला.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी केलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ अशा अनेक वस्तूचे प्रदर्शन मांडून प्रमुख पाहुण्यांच्या सोबत सेल्फी घेण्यात आली.पालक सभेमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून  पूनम कांबळे व पुरुष पालक मधून निसार विजापुरे यांची निवड करण्यात आली.
        सदर रोबोटिक लॅब ही संस्थेचे संस्थापक मरहूम् हाजी मुनिरुद्दीन मुल्ला व माजी मुख्याध्यापिका मरहुमा हज्जन शहनाजबेगम हारूनरशीद मुल्ला यांच्या स्मरणार्थ संस्थेचे सचिव हाजी हारूनरशीद मुल्ला यांनी देणगी दिलेली आहे.त्याचबरोबर पालक सभेमध्ये निर्भया पथक यांनी पालकांचे व विद्यार्थ्यांचे  उद्बोधन केले.पालकांना सहल व स्नेहसंमेलन बाबतीत सूचना माननीय श्री पाटील सरांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या चौगुले मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार माननीय श्री भालदार सर यांनीं केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)