ज्ञानदीपाची दीपावली हा उपक्रम म्हणजे वैचारिक मेजवानी देणारा - दीपक कदम

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील  ज्ञानदीपाची दीपावली हा उपक्रम म्हणजे वैचारिक मेजवानी देणारा असून हा  उपक्रम म्हणजे पर्यायी विधायक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

बालकांसह अनेक विचारवंत, कलावंत यांना विचारपीठ देणे गरजेचे असते. या उपक्रमात अनेकांना सन्मान दिला जातो.ही अतिशय स्तुत्य बाब असून ज्ञानाची पेरणी करणार्‍या ह्या कार्यक्रमात माझा राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, हा माझा एकट्याचा सन्मान नाही तर आंबेडकरवादी मिशन आणि समाजासाठी त्याग करणार्‍यां व्यक्तिचा सन्मान असल्याचे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी  प्रतिपादन केले. ते दरेगावाचे भूमिपुत्र डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या संकल्पनेतून गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षी ज्ञानदीपाची दीपावली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

त्या कार्यक्रमाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी तथा लक्ष्यवेधचे विश्वस्त अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे हे होते. तर उद्घाटन या नात्याने मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लक्ष्यवेधचे विश्वस्त विश्वस्त कामाजी पवार हे होते.

 विचारपीठावर स्वागताध्यक्ष म्हणून श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर,श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य पांडुरंगराव पावडे, लेखक डॉ.यशवंत चव्हाण , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, राज्य पुरस्कार प्राप्त पंडित पवळे, मारोतीराव शिंदे, जलतज्ज्ञ तथा नागदरवाडीचा कायापालट घडवून आणणारे  बाबुराव केंद्रे , पी.बी वाघमारे, डॉ शिवाजी कागडे, डॉ.केशव पाटील, शिवराज पाटील वडजे, सुभाष पा. शिंदे,माधवराव पा.भालेराव, मारोती पा.शिंदे, संतराम रामशेटवार, डॉ. साईनाथ शेट्टोड,  उत्तम गवाले, सुभाष पा.शिंदे, साहेबराव पाटील शिंदे, सदाशिव हाम्पले, राष्ट्रपाल चावरे,  बाळू पाटील पानपट्टे,मोहनराव पा.पवार, विजय मंदावाड, मुख्याध्यापक अविनाश बामणे शिवाजी लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना  एकनाथ मोरे म्हणाले, उपक्रमशील व्यक्तिमत्त्व हनुमंत भोपाळे हे स्वखर्चातून 25 वर्षांपासून ज्ञानदीपाची दीपावली ह्या प्रबोधनात्मक उपक्रमाची अंमलबजावणी करत आहेत.हा उपक्रम समाजाला विधायक दिशा देणारा आहे असून मानवी जीवन उन्नत होण्यासाठी जीवन साक्षरता अतिशय गरजेची बाब आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो. ही भावनादेखील जीवन साक्षरता आहे.

ज्ञानदीप दीपावलीच्या माध्यमातून जीवन साक्षरतेचे धडे मिळतात,या धड्याची आज समाजाला अधिक गरज आहे. प्रचंड प्रदुषण वाढलेले असताना असंख्य लोक फटाके फोडून प्रदुषणात वाढ करत आहेत.यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत आहेत.

ज्ञान दीपावलीत ज्ञानाचे, विचारांचे फडाके फोडून वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी ज्ञानदीपाच्या दीपावलीच्या माध्यमातून अखंडितपणे प्रयत्न होत आहे. अनेक अडचणींवर मात करत ज्ञानदीपाची साधना केली जात आहे.ही खरंच प्रेरक बाब असून समाजाची जाण आणि भान असलेल्या माणसांने गावागावांत ज्ञानदीपाची दीपावली साजरी करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एकनाथ  मोरे यांनी केले. भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दोन दिवस चाललेल्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात  पहिल्या दिवसी दि. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता गाडगेबाबांचा वेश परिधान करून ज्येष्ठ शाहीर तथा कीर्तनकार दुगू तुमवाड यांनी प्रबोधनात्मक किर्तन सादर केले तर दुस-या दिवशी  राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार सोहळा, व्याख्यान, गुणवंत व सामाजिक योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि बाल मेळावा घेण्यात आला.  यावेळी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांना राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख 5 हजार रूपये, मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

याप्रसंगी बाबुराव केंद्रे, उद्धव पाटील बैस, कोंडिबा बुरपले, डॉ. यशवंत चव्हाण, बाबाराव पा.शिंदे, पंडित पवळे, शिवा कांबळे, डॉ. केशव पाटील, भा.ग. मोरे, संगमेश्वर लांडगे, शिवराज वडजे, रमेश पवार, पी.बी. वाघमारे, अविनाश बामणे, डॉ. वैजनाथ हंगरगे यांना शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना कामाजी पवार म्हणाले की, ज्ञानी समाज नेहमी प्रगतीपथावर असतो. वेगवेगळ्या विधायक उपक्रमांमुळे समाजाची वैचारिक जडणघडण होण्यास मदत होते.

ज्ञानदीपाची दीपावली हा उपक्रम म्हणजे हा निष्ठा आणि त्यागाचा भाग असून  या अभिनव उपक्रमाचे जनक डॉ. हनुमंत भोपाळे हे  कौतुकास पात्र असून असे उपक्रम गावागावात सुरू झाल्यास गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले.

डॉ.साईनाथ शेटोड यांनी प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण करून ज्ञानामुळेच खरा आनंद मिळतो.ज्ञानदीपाची दीपावलीतून पोटाच्या फराळाबरोबर बुध्दी आणि मनासाठी आवश्यक असलेला  वैचारिक आणि भावनिक फराळ दिला जात आहे ही बाब अतिशय दिशादर्शक आणि समाजाची वैचारिक श्रीमंती वाढवणारी बाब असल्याचे सांगितले. जलतज्ज्ञ बाबुराव केंद्रे म्हणाले, गावाचा विकास करण्यासाठी गावाने एकत्र आले पाहिजे.

समाजाला एकमेकांपासून दूर नेण्याचे कटकारस्थान काही लोक करत असतात. अशी नकारात्मकता एका बाजूला असताना गावाला एकत्र आणून गावाच्या विकासासाठी धडपड ज्ञानदीपाच्या दीपावलीच्या निमित्ताने होते आहे,ही बाब मला आवडल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी सामाजिक योगदान देणार्‍या माणसांमुळेच सामाजिक उपक्रम जीवंत राहतात, वैचारिक मेजवानी देणा-या कार्यक्रमामुळे समाज गतिशील होण्यास मदत होते. ज्ञानदीपाची दीपावली हा कार्यक्रम समाजाला गतिशील करण्यासाठी मदत करणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

ग्राम विकास प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  उध्दव पाटील बैस म्हणाले आमच्या परिसराला दिशा देण्यासाठी डॉ. हनुमंत भोपाळे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षी हा कार्यक्रम घेतात. संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आमच्या संस्थेचा सन्मान केला. त्यांनी  कृतज्ञता मूल्यांची जोपासना करत असल्याचे  प्रतिपादन केले.

रमेश पवार म्हणाले, ज्ञानदीपाची दीपावली ही संकल्पना अभिनव असून नवसमाज निर्माणासाठी अशा उपक्रमांमुळे मदत होते. मुख्याध्यापक अविनाश बामणे यांनी ज्ञानदीपाची दीपावली ह्या कार्यक्रमामुळे आमच्या परिसरात शैक्षणिक जागृती निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

ज्ञानदीप दीपावलीच्या माध्यमातून बालकांसाठी जो बालक मेळावा आयोजित केला जातो, त्यामुळे बालकांच्या चालना मिळण्याची मदत होते असे सांगितले. ह्या प्रसंगी पंचक्रोशीतील उपस्थित व्यक्तींच्या पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

 यावेळी अनेक मान्यवरांची यथोचित भाषणे झाली.  एखादा उपक्रम सतत अंमलबजावणी केल्यामुळे त्या गाव, संस्था आणि व्यक्तीची ओळख निर्माण होते.

अध्यक्षीय समारोप करताना एकनाथ मोरे म्हणाले की, दरेगावची ओळख ज्ञानदीपाची दीपावली साजरी करणारे दरेगाव अशी होत,हे ज्ञानदीपाची ह्या अभिनव कार्यक्रमाचे यश आहे. ज्ञानामुळे समाजाचा कायापालट होण्यास मदत होते.

त्यामुळे ज्ञानकेंद्रित उपक्रम राबविण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे .दरेगावची ओळख ज्ञानदीपाची दीपावली साजरे करणारे दरेगाव अशी होत आहे.दरेगावात जन्म घेतलेल्या ज्ञानदीपाची दीपावलीचे अनुकरण समाजाने करावे.

नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील भूमीपूत्र डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या संकल्पनेतून गेल्या 25 वर्षांपासून ज्ञानदीपांची दीपावली हा नाविण्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केला जातो,ही बाब प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माझी शाळा अभियान अर्थात माझं गाव माझी शाळा ह्या उपक्रमाला साथ देण्यासाठी दरेगावच्या शाळेसाठी अनेकांनी  वस्तू रूपाने मदत जाहीर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले. मानपत्राचे वाचन सोनू दरेगावकर यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप पा.शिंदे यांनी केले. आभार माजी सरपंच देवीदास पा.भोपाळे यांनी मानले. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर गागलेगावकर विनायक आमनवाड, प्रा.जितेंद्र पवार, बाळासाहेब पांडे, पत्रकार मुखेडकर, किशनराव वाकोरे, बालाजी सोमनकर,शरीफ शेख, शेख सादिक, संजय मुदळे, व्यंकटेश बैस, रवी सोळंके, भीमराव लांडगे, पिंटू सोनमनकर, बळीराम यलमिटवार, अशोकराव पा. शिंदे, सज्जन पा. हुबांड, रामराव शिंदे,आनंदा शिंदे, मनोहर शिंदे, संभाजी शिंदे, रामदास शिंदे , दादाराव शिंदे,देवीदास शिंदे,किशन शिंदे,बळी शिंदे,उत्तम शिंदे, केशव शिंदे, बाबुराव कानगुले, संभाजी रामशेटवाड, केरबा भोपाळे  गोविंद गजलवाड, संतोष साळुंके , दिगंबर भोपाळे, रमेश भोपाळे, हनुमंत शिंदे, शिवराज शिंदे , जीवराज शिंदे, योगेश भोपाळे, नागेश भोपाळे आदींसह दरेगाव व परिसरातील   गावचे  विद्यार्थी नागरिक उपस्थित होते. सहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)