शालेय बालसभेने केले चाचा नेहरू यांना अभिवादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.‌ शाळा महाविद्यालयांमधूनही पं. नेहरू यांना अभिवादन करण्यात येते. जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या महात्मा करमचंद गांधी शालेय बालसभेने पं. नेहरू यांना अभिवादन करून बालदिन साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शालेय बालसभेचे इयत्ता तिसरी आणि चौथी मधील सहयोगी सदस्य अजिंक्य गोडबोले, राजवर्धन गवारे, सपना हटकर, शालीनी हटकर, नामदेव पांचाळ, वीर गोडबोले, मारोती गोडबोले, नागेश मठपती, स्वराज शिखरे, सतीश साबणे, शाश्वती गच्चे, विद्या गोडबोले यांची उपस्थिती होती. 

           पं. जवाहरलाल नेहरू हे लहान मुलांचे चाचा नेहरू म्हणून ओळखले जात. १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा होतो. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय बालसभेच्या सर्व सदस्यांनी स्वतःहून पुष्पहार तयार करून नेहरू यांना पुष्पवंदन केले. दीपावलीच्या सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांना दीवाळी फराळ म्हणून स्वाध्यायपुस्तिका आणि अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दररोज सकाळ संध्याकाळ एक तास स्वयं अध्ययन सुरू आहे. अशातच मुख्याध्यापक ढवळे यांनी सुचविल्या प्रमाणे जयंतीचे औचित्य साधून शालेय बालसभेने चाचा नेहरू यांना अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)