जागतिक टपाल दिनी विद्यार्थ्यांनी लिहले पालकांना तंबाखू सोडण्याविषयी पत्र

शालेयवृत्त सेवा
0

 



लोणी जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद लोणी शाळेत जागतिक टपाल दिनी विद्यार्थ्यांनी पालकांना तंबाखू सोडविल्याविषयी विनंती पत्र लिहिले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

      ९ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन. टपालाचे महत्व संगणकिय युगातही कमी होत नाही. पोस्ट कार्डचा वापर जवळपास बंद झाले असतांनाही पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड वर आई बाबा, आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, यांना तंबाखू, गुटखा, बिडी सिगारेट घेऊ नका. तुम्ही खुप चांगले आहात. तंबाखूमुळे कॅन्सर होतो. तुमच्या लाडक्याचे ऐका ना ! अशा आशयाचे भावूक पत्र लिहून पालकांना विनंती केली आहे.

         तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. तंबाखू मध्ये निकोटीन हे विषारी द्रव्य असते त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक आजारासी लढत आहेत तेव्हा अशा तंबाखूजन्य पदार्थापासून सर्वांनी दूर रहावे. शाळा तंबाखूमुक्त झाली आहे आता गावही तंबाखूमुक्त करूया ! असी आर्त हाक चिमुकल्यांनी पालकाला केली आहे. विविध उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदविधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे प्रयत्नशील असतात.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)