शिक्षकाच्या अंगी असलेले कला गुण संधीतून अभिव्यक्त झाले पाहिजे - नागराज बनसोडे

शालेयवृत्त सेवा
0

 


 

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाची विभागीय गीत गायन स्पर्धा संपन्न 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

         अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचा उद्देश वाखाणण्याजोगा आहे. शिक्षकांना मंडळाच्या वतीने विविध संधी उपलब्ध करून देतात म्हणून शिक्षकांचे अंगी असलेले कलागुण अशा संधीतून अभिव्यक्त झाले पाहिजे असे प्रतिपादन नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी केले. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र आयोजित मराठवाडा विभागस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर, केंद्रप्रमुख माधवराव दुधमल, विभागीय सचिव शेषराव पाटील, बाबुराव माडगे हे होते. प्रारंभी रोपाला पाणी घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री बनसोडे हे शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे प्रशंशा केली.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले. मराठवाडा विभागातून नांदेड, परभणी, बीड व हिंगोली या जिल्ह्यांतून स्पर्धेसाठी 21 स्पर्धक आपल्या अभिव्यक्ती सादर केल्या. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी यातून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली असून प्रथम क्रमांक श्री मिलिंद कंधारे व एम एस थोरात, द्वितीय चंद्रकांत कदम, तृतीय संदीप खटावकर, उत्तेजनार्थ संभाजी बंडेवार आणि महादेव लांडगे यांचे निवड करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण सुधीर मरवाळीकर व साहेबराव डोंगरे यांनी केले.

          मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांच्या गीतगायने अध्यक्षीय समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे जिल्हा सचिव रुपेश मुनेश्वर आणि मनोज बारसागडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कंधारे तर विभागीय सचिव शेषराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. ज्योती इंगोले, स्वाती स्वामी, श्वेता आलोने, महादेव लांडगे, जालिंदर भास्करे, शेख सैलानी, संदीप खटावकर, अंबादास इंगोले, सागर चेके,  मुनेश्वर थोरात, भारतध्वज सरपे, सुरेश मोरे, संभाजी बंडेवार, चंद्रकांत कदम यांनी सक्रीय सहभाग घेतला. अध्यापना सोबत धावपळीच्या युगात संगीत कलेतून स्वानंद मिळवणे शिक्षकांचे असे प्रयोग स्वतः समाजाचे स्वास्थ्य टिकविण्याचा एक प्रयत्न होऊ शकतो यात शंका नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)