कमठाला केंद्रस्तरीय शिक्षण परिषद लोणी शाळेत संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



वर्षा कुलकर्णी शिक्षिकेने शाळेस दिला साऊंड बॉक्स भेट !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे कमठाला केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. यावेळी लोणी वरून बदली झालेल्या वर्षा कुलकर्णी यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विजय मडावी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर होते.      

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी केले. त्यानंतर लोणी शाळेतून मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांची बदली झाल्याने त्यांना आहेररुपी भेट देऊन निरोप देण्यात आला. यावेळी त्यांनी शाळेसाठी दहा हजाराचा साउंड बॉक्स भेट दिला. यावेळी उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी शेलुकर, केंद्रप्रमुख विजय मडावी, केंद्रीय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदविधर शिक्षक अंकुश राऊत यांनी केले तर आभार तंत्रस्नेही शिक्षिक राहूल तामगाडगे यांनी मानले. शालेय मंत्री मंडळाने तयार केलेले ' छायांकित शाळा' आणि ' वर्तमानपत्रात शाळा ' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक झाले.

       दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षण परिषदेतील विविध विषयावर सुलभक म्हणून प्रवीण पिल्लेवार, शालिनी शेलुकर, बाबासाहेब आढाव, राहुल तामगाडगे, तुळशीराम टेकाम यांनी काम पाहिले. प्रशासकिय सुचनेनंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. यावेळी प्रीतम पाटील, स्वरूपा दमय्यावार, अविनाश दासरवार, परमेश्वर महामुने, नंदकुमार जाधव, देविदास वंजारे, राजू भगत, विवेक पेगरलावार यांसह केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेयमंत्री मंडाळातील प्रतिक गुंजकर, पूर्वी धुर्वे, निशांत खरे, सम्रदा बादड, श्रुती काळे, ज्योती कोसरे, ऋषीकेश सोळंके, मंत्रा गुंजकर आदिनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)