सहकार विद्या मंदिरमध्ये रंगले कविसंमेलन..

शालेयवृत्त सेवा
0

 


 

श्री राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


बुलढाणा ( शालेय वृत्तसेवा ) : अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा संचलित सहकार विद्या मंदिर व बुलढाणा परिवार मातृतीर्थ सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने मा. श्री राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी संस्थापकीय अध्यक्ष बुलढाणा अर्बन यांचा दिनांक 2 /10/ 2023 ला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सहकार विद्या मंदिर सिंदखेडराजा येथे दिनांक 30 /9/ 2023 ला कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते .या कवी संमेलनाच्या सुरुवात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. संमेलनाचे उद्घाटक मा. अॅड  विजयकुमार कस्तुरे व कविसंमेलनाचे अध्यक्ष श्री बाबाराव डोईजड तसेच बुलढाणा अर्बन संस्थेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जोशी  यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कवि संमेलनाचे उद्घाटन केले.  सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजाचे मुख्याध्यापक डॉ.डि.व्ही. इंगळे  यांनी प्रास्ताविक पर भाषण केले या कवीसंमेलनाचे  अध्यक्ष व   सुप्रसिद्ध लेखक कवी यांनी आपल्या भाषणातून नवोदित साहित्यिकांनी  दर्जेदार साहित्य निर्माण करून साहित्यात मोलाची भर घालावी व बदलत्या काळाप्रमाणे मराठी भाषा व साहित्याचा प्रसार आणि प्रचार कराव. असे आवाहन केले. 

या कवी संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा अर्बन चे विभागीय व्यवस्थापक श्री श्रीकांत जोशी तर डॉ. बबनराव महामुनी मा. डॉ. डी. व्ही खरात सौ. विद्या सरपाते मा. प्रा. मधुकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी कविता सादरीकरण करून प्रेक्षकांची मनी जिंकली. त्याचबरोबर पंचक्रोशीतून सहभागी  झालेले प्रसिद्ध कवी अँड. वर्षा कांकाळ ,चेतन पवार, राहुल चव्हाण, मिलिंद इंगळे ,पवन तिकटे, गणेश शिंदे, राजेश खेडकर , काझी मॅम , मनोहर झोरे, रविंद्र देशमाने, रंजीत राठोड, ज्ञानेश्वर पडघान ,आदींनी  कवीनी आपल्या कविता व गझल रचना  सादर करून संमेलनाची उत्कृष्ट शोभा वाढवली. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी  सुद्धा सहभाग नोंदविला यात वेदिका नागरे, कल्याण हिवाळे, पूनम राजे, विशाखा कुंरुगळ,  ऋचा देशपांडे, या बालकवींनी रसिकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे आयोजक व उत्कृष्ट सूत्र संचालक, साहित्यिक व कवी श्री मारोती रायमुलकर यांनी भारदार असे सूत्रसंचालन केले. या संमेलना मध्ये विशेष कार्यक्रमाची भर घातली. या शाळेचे उत्कृष्ट कला शिक्षक यांनी मा.श्री  राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांची रांगोळी तून 15 बाॅय 12 फूट अशी भव्य उत्तम अशी प्रतिमा साकारून या संमेलनाची अधिकच शोभा वाढवली. या कवीसंमेलनाचे आभार प्रदर्शन कवी मनोहर झोरे यांनी केले. या कवीसंमेलनास सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)