राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागीर येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


कुमारी श्रीजा हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

भारताचे माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागीर विभाग आष्टी तालुका हदगाव जिल्हा नांदेड शाळेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती.

        या परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना आज दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी परिपाठात श्रीमती श्वेता आलोने मॅडम यांची सुकन्या कुमारी श्रीजा हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीसाच्या रुपात देण्यात आले.

       तृतीय क्रमांकाचे बक्षीस अग्निपंख, एपीजे अब्दुल कलाम यांचे चरीत्र कुमारी संध्या बालाजी उमरे यांना, द्वितीय क्रमांकाचे बक्षिस आय डेयर श्रीमती किरण बेदी यांचे चरित्र कुमारी श्रेया ज्योतीराम पवार यांना तर प्रथम, क्रमांकाचे बक्षीस स्टीफन हॉकिंग शास्त्रज्ञ यांचे आत्मचरित्र ,सुरज राजू भवरे यांना देण्यात आले. प्रथम ,द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देण्यात आले.

        तसेच उर्वरित चौथी, पाचवी, सहावी ,सातवी ,आठवी वर्गातील यशस्वी व  गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना मोठे रजिस्टर अशा एकूण 29 विद्यार्थ्यांचा श्रीमती आलोने  मॅडम, श्री ओम सूर्यवंशी सर, श्री अरविंद सूर्यवंशी सर यांनी रजिस्टर देऊन शाळेत सन्मान करण्यात आला. 

        यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सोनबा दवणे सर , शाळेचे पदवीधर शिक्षक श्री सुनील मोरे सर , विषय शिक्षक श्री अरविंद सूर्यवंशी सर ,विषय शिक्षक श्री ओमप्रकाश सूर्यवंशी सर, श्री जे.डी सूर्यवंशी सर . श्री माधव जाधव सर ,श्री लोकेश मस्के सर ,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती फुले मॅडम, श्रीमती वडजे मॅडम व श्रीमती आलोने मॅडम व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. 

त्यानंतर विद्यार्थ्यांना पुरस्कार खाऊ वाटप करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)