शाळा निरीक्षण समितीची निळा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट !

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथामिक शाळा निळा येथे शाळा निरीक्षण पथकाने भेट दिली. पथक प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्ग 1, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नांदेड तथा अध्यक्ष शाळा निरीक्षण समिती नांदेड न्या.एस.ए.बांगर साहेब, नांदेड जिल्हा परिषदेचे माध्यामिक शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर साहेब,उपशिक्षणाधिकारी नांदेड मा.बनसोड साहेब,मा माने साहेब एस.डी.एम नांदेड ,मा आवटे साहेब,मा.पवार साहेब पोलिज निरीक्षक लिंबगाव, केंद्रप्रमुख श्री घोडजकर सर यांनी सायंकाळी 7.30 ला भेट दिली शाळेच्या पूर्ण भौतिक सुविधा ची पाहणी केली.

स्वच्छताग्रह आणि प्रत्येक वर्म खोली चे बारकाईने नियिक्षण केले.लगेच काय काय त्रुटी आहेत आणि काय काय चांगले वाटले याबद्दल आपला लेखी अभिप्राय लिहिला,शालेय परिसरात तंबाखू खाऊन थुंकल्याचे आढळून आले, तसेच शालेय मालमत्तेचे नुकसान होत आहे त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक यांना दिले. शाळेच्या 4 खोल्या गळतात, शाळेच्या उत्तर बाजूस संरक्षण भिंत,किचन शेड नाही, पुरेसे स्वच्छता गृह नाही,या मागणीचा प्रस्ताव मुख्याध्यापक यांनी लवकरात लवकर पाठवावा असें निर्देश देण्यात आले.

                      शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री कैलास पोहरे सर यांनी न्यायमूर्ती बांगर साहेब, माने साहेब,दिग्रस्कर साहेब, बनसोडे साहेब,आवटे साहेब, पवार साहेब यांचे स्वागत करण्यात आले. साहेबांनी अतिशय काटेकोर पने शाळेतील संपूर्ण भौतिक सुविधाची पाहणी केली.5,6,7 च्या मुलींसाठी पुरवण्यात आलेली मशीन योग्य ठिकाणी लावल्याबद्दल समितीने मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले अतिशय व्यस्त असतानाही साहेबांनी खूप वेळ दिला.

आज पोळा असतानाही शालेय विदयार्थी आणि आमच्या शाळेतील श्रीमती पांडे मॅडम, श्रीमती गंजेवार मॅडम,श्रीमती रत्नपारखी मॅडम,श्रीमती कर्णेवार मॅडम,श्रीमती मोखंडपल्ले मॅडम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.प्रल्हाद जोगदंड आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)