राज्यातील ३९ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर

शालेयवृत्त सेवा
0





साप्ताहिक ' शिक्षक ध्येय ' चा उपक्रम !

पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे.


राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 

A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी) 

B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत.) 


A आणि B गटातील एकूण ३९ विजेत्या शिक्षिका, शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. श्री. नारायण पडूळ अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद आणि श्री. बजरंग गोविंदराव बोडके, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


स्पर्धेतील विजेते -


A) प्राथमिक शिक्षक  (अंगणवाडी ते सातवी) गटात


सौ. मृगया मंगेश मोरे, जि. प. पू. प्राथमिक शाळा कोलधे नं १, ता. लांजा, जि. रत्नागिरी; वसुधा वैभव नाईक, अरणेश्वर शिक्षण संस्था सहकार नगर जि. पुणे; अश्विनी अशोककुमार बुंधे, जि. प. प्राथमिक मराठी शाळा, देवठाणा जि. वाशिम; श्रीमती वेरोनिका श्रीनिवास अवसरमल, जि. प. प्राथमिक शाळा बोरावकेवस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर; कु. करुणा गंगाराम गावंडे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा आर्वी, ता. राजुरा जि. चंद्रपूर; सौ. वर्षा प्रविणजी गवारले, केसरीमल नगर विद्यालय सिंदी (रेल्वे) ता. सेलू, जि. वर्धा; सत्वशिला गोरखनाथ पाटील, जि. प. प्रशाला, जवळाबाजार, ता. औंढा, जि. हिंगोली; कु. अंजली विजय कडू, जि. प. प्राथमिक मराठी शाळा, झापल ता. धारणी जि. अमरावती; श्री. दिग्विजय नागोजी फडके, श्री. सातेरी जि. प. केंद्र शाळा साटेली भेडसी ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग; श्री. भोजराम लेखराम लंजे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भाडभिडी (बी) ता. चामोर्शी जि. गडचिरोली; श्रीमती करुणा बाबुराव मोहिते, जि. प. आदर्श केंद्र शाळा निगडी ता. शिराळा जि. सांगली; सुरेखा सोपान बनकर, जि. प. प्राथमिक शाळा, कौठीमळा, ता. इंदापूर जि. पुणे; श्री. मधुकर गोविंद शिंदे, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वाडोस नं. १ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग; श्रीमती मनिषा कृष्णा सोनवणे, जि. प. प्राथमिक शाळा परंदवडी, ता. मावळ जि. पुणे; सौ. वासंती अनिल कोदांडे, जि. प. शाळा शिरगाव (क) ता. तासगाव जि. सांगली; श्रीमती मुक्ता पंजाबराव आपोतीकर, जि. प. प्राथमिक शाळा तेलवाडी, ता. कन्नड जि. औरंगाबाद; उत्कर्ष अनिल जैन, उत्कर्षाची प्रयोगशाळा जि. अकोला; सौ. कोमलकांता कमलाकर बनसोड, जि. प. प्राथमिक उच्च शाळा मानोरा जि. नागपूर; परमेश्वर रामचंद्र नरवटे, जि. प. प्राथमिक शाळा शेकापूर ता. हिंगणघाट जि. वर्धा; अनुप कमलाकर कुलकर्णी, बाल विद्या प्रसारक मंडळ आदर्श प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा सी बी एस नाशिक; अश्विनी सुभाष दीक्षित, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदा नगर ता. बारामती जि. पुणे; श्री. रविंद्र बालाजी देबडवार, जि. प. प्राथमिक शाळा शेटफळ ता. मोहोळ जि. सोलापूर; राहुल खासेराव धुमाळ, जि. प. प्राथमिक शाळा दुगलगाव ता. येवला जि. नाशिक; श्रीमती छाया शिवाजी कुंभार, जि. प. शाळा वासुंबे ता. तासगाव जि. सांगली 


B) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक (आठवी ते पदवीपर्यंत) गटात


श्री. तुषार चंद्रकांत म्हात्रे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र ता. वसई जि. पालघर; मुकुंद मारुती दहिफळे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि. अहमदनगर; डॉ. संतोष गणपती जांभळे, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर ता. पन्हाळा जि. कोल्हापूर; श्री. योगेश चंद्रकांत नाचणकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती ता. चिपळूण जि. रत्नागिरी; श्रीमती राणी तुकाराम जाधव, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, फुलवडे ता. आंबेगाव जि. पुणे; श्री. विजय वसंत अहिरे, कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार; श्री. मिलिंद यशवंत दीक्षित, संजय गांधी स्मृती विद्यामंदिर हिंगणघाट जि. वर्धा; श्री. चेतन रमेश पाटील, श्री सातपुडा वैभव विद्यालय वाण्याविहीर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार; श्री. अतुल रमेशराव पडोळे, जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट ता. वरुड जि. अमरावती; श्री. चैतन्य महादेव सुकी, श्री देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग; डॉ. अनिस मोहम्मद बेग, जी. बी. एम. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हिंगणघाट जि. वर्धा; श्री. रविंद्र तुकाराम देवरे, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नाळेगाव ता. दिंडोरी, जि. नाशिक; सौ. वैशाली प्रविण खाचणे, श्री स्वामी नारायण गुरुकुल संस्था सावदा ता. रावेर जि. जळगाव; योगेश देविदास क्षिरसागर, गुरुकृपा क्लासेस ब्रम्हानंदनगर ता. भिवंडी जि. ठाणे; श्री. दशरथ माणिकराव वडाळ, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तोरंगण ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक .


सर्व विजेत्यांचे शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, तसेच संपादकीय मंडळ आणि शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.


(अडचण असल्यास संपर्क मधुकर घायदार, संपादक, साप्ताहिक शिक्षक ध्येय नाशिक 9623237135)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)