गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

गोविंदेश्वर प्राथमिक शाळा खंडोबा चौक तरोडा बुद्रुक नांदेड या शाळेत  ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन स्वयंशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त एक दिवसाचे शिक्षक म्हणून शाळेत आले. विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून प्राची इंगोले या विद्यार्थिनीने भूमिका बजावली तसेच शिक्षक म्हणून गुंजन दिग्रसकर शितल देवकते प्रणाली इंगोले श्रीजा सूरेवाड सोहम शिंदे गायत्री लिंबोळे प्रणव नामवाड रिहान शेख शैलेश बसवे पायल गवारे यांनी शिक्षकाची भूमिका बजावली आणि अनिकेत डांगे यांनी उत्तम सेवकाची भूमिका बजावली तसेच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देखील शाळेत साजरी करण्यात आली. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी प्रथम प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा दिग्रसकर यांनी केले शाळेतील जेष्ठ शिक्षक एम एस नामवाड शोभा किडे संध्या सिंदगीकर बालाजी गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)