तालुका स्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात सरस्वती विद्या मंदिर किनवटच्या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला

शालेयवृत्त सेवा
0

 


जिल्हा स्पर्धेत होणार सादरीकरण !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे (ता.९सप्टेबर) तालुका स्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव साजरा करण्यात आला.  मुख्याध्यापक तथा प्राचार्य शेख हैदर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या नाट्य महोत्सवाचे परीक्षक म्हणून विज्ञान नाट्य प्रेमी  महेंद्र नरवाडे यांनी काम पाहिले.

यावेळी उपमुख्याध्यापक अंबादास जुनगरे , मुख्याध्यापक शेंडे सर शिक्षिका प्रियंका बनगीनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या तालुका स्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात सरस्वती विद्या मंदिर किनवटच्या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला असुन या नाटिकेची जिल्हा स्तरावरील नाट्य महोत्सवासाठी निवड झाली आहे.नाट्य महोत्सवात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा, हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी, सरस्वती विद्या मंदिर किनवट या शाळांनी सहभाग घेतला होता. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विज्ञान शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी केले तर गंगाराम श्रीमंगल यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक  किशोर डांगे,प्रमोद मुनेश्वर,सुरेश किनवटकर,प्रशांत डवरे, सुरेंद्र पाटील,सतिश विणकरे यांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)