वाढदिवसानिमित्त जिल्हापरिषद रोहिदासतांडा शाळेतील विद्यार्थ्यांना केले स्कूल बॅगचे वाटप !

शालेयवृत्त सेवा
0

 



संतोष भरकड यांचा सामाजिक उपक्रम !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा) :

किनवट तालुक्यातील रोहिदासतांडा शाळेत कमठाला येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भरकड यांनी वाढदिवसानिमित्त  सर्व विद्यार्थ्याना स्कूल बॅगचे वाटप केले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमठाला ग्रा.पं.च्या सरपंच  अनुसयाबाई तडसे होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बालाजी पाटील भरकड ग्रामपंचायत सदस्य  शेषराव मुळेकर ,नारायण नाकाडे,ग्रामसेवक संतोष ताडेवार,शिक्षणप्रेमी नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते मारोती पाटील सुरोशे,मारोती तवरकर ,कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख  विजय मडावी,रोहिदासतांडा येथील ग्रामस्थ माजी सैनिक साहेबराव चव्हाण व  मोहन चव्हाण हे उपस्थित होते. 

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमठाला केंद्राचे मुख्याध्यापक शरद कुरुंदकर यांनी  केले.याच  कार्यक्रमात माजी सैनिक साहेबराव चव्हाण यांनी शाळेला नेत्यांचे फोटो भेट म्हणून दिले.केंद्रप्रमुख विजय मडावी यांनी संतोष भरकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा समाजउपयोगी उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श निर्माण केल्याचे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

       रोहिदासतांडा शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी सेलुकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सहशिक्षक शुद्धोधन पारधे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.विद्यार्थ्यांना व उपस्थितांना फराळ साहित्य वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)