शिक्षिका पंचफुला वाघमारे यांना सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील आंबेडकरी निवेदिका तथा उपक्रमशील शिक्षिका पंचफुला वाघमारे यांना सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा शैक्षणिक विभागातून सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून याबाबतचे पत्र सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हटकर यांनी दिले. 

यावेळी सत्यशोधक विचार मंचाचे सचिव श्रावण नरवाडे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, वरिष्ठ सल्लागार अनुरत्न वाघमारे, राज्यस्तरीय आंबेडकरी विचारवेध परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष तथा साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार, स्तंभलेखक मारोती कदम, जयंती ढवळे, युवराज ढवळे यांची उपस्थिती होती. 


         गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असतांना शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शाळेत आणण्याचे शैक्षणिक कार्य पंचफुला वाघमारे यांनी केले आहे. त्या हदगाव तालुक्यातील मौजे डोरली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

 कोरोनाकाळातही केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शहरात येत्या १९ सप्टेंबर २०२३ रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी विचारवेध परिषदेच्या उद्घाटन सत्रात वाघमारे यांना सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. पंचफुला वाघमारे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)