मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त “गाथा मुक्तिसंग्रामाची” दोन अंकी नाटकाचा प्रयोग

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, किनवट, माहूर, हिमायतनगर, बिलोली, नायगाव, मुदखेड आणि उमरी या 10 तालुक्यात हैदराबाद स्वातंत्र्याचा रणसंग्राम या नाटकाचे होणार सादरीकरण !

नांदेड (जिमाका) दि. 14 :- मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारीत “गाथ मुक्तिसंग्रामची” या दोन अंकी नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत.  


मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, किनवट, माहूर, हिमायतनगर, बिलोली, नायगाव, मुदखेड आणि उमरी या 10 तालुक्यात हैदराबाद स्वातंत्र्याचा रणसंग्राम या नाटकाच्या सादरीकरण व नांदेड जिल्ह्याच्या  समन्वयासाठी नाथा चितळे यांची समन्वयक म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नियुक्ती केली आहे. अमृत नाट्य महोत्सवात गाथा मुक्तिसंग्रामाची हे नाटक मराठवाड्यातील 10 तालुक्यात 18 सप्टेंबर 2023 पासून सादर केली जातील.  


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)