उपक्रमशील शिक्षक मिलिंद जाधव यांच्या 'मराठवाडा मुक्तिसंग्रामातील नांदेड जिल्ह्याचा सहभाग ' या पुस्तकांचे जिल्हा न्यायाधिश मा.गाडवे साहेबांच्या हस्ते झाले प्रकाशन..

शालेयवृत्त सेवा
0

संशोधनात्मक ग्रंथाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित कन्या शाळा भोकरचे उपक्रमशील शिक्षक  मिलिंद जाधव लिखित "मराठवाडा मुक्तिसंग्रामातील नांदेड जिल्ह्याचा सहभाग " या पुस्तकांचे प्रकाशन जिल्हा न्यायाधिश मा.गाडवे साहेब आणि तहसिलदार तथा न.प.चे सीओ मा. राजेश लांडगे, यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित, तहसिल प्रशासन भोकर, जिल्हा सत्र न्यायालय भोकर आयोजित विविध शाळा कॉलेजमधील विद्यार्था, विविध शासकीय कार्यालयातील कार्यालयीन प्रमूख, कर्मचारी, तसेच प्रमुख अधिकारी वर्ग जिल्हा सत्र न्यायाधिश, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांची रॅली झाली.

समारोप प्रसंगी मिलिंद जाधव लिखित "मराठवाडा मुक्तिसंग्रामातील नांदेड जिल्ह्याचा सहभाग" या पुस्तकांचे प्रकाशन जिल्हा न्यायाधिश मा.गाडवे साहेब, तहसिलदार तथा न.प.चे सीओ मा. राजेश लांडगे, यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

याप्रसंगी विधी समिती, शहर तालुक्यातील अधिकारी, शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)