जिजाऊ ज्ञानमंदिरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शरद जोगदंड ) :

        मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ' दहीहंडी ' उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.त्यात १२७ राधा व कृष्ण वेशभूषा परिधान करून दहीहंडी उत्सवात आपला उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदविला होता. यावेळी मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली व पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट राधा व कृष्णा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परिक्षक म्हणून प्रा. नागनाथ कांबळे सर , प्रा. प्रकाश भद्रे सर , डॉ. सौ. राधिका मॅडम यांनी काम पाहिले. 

परिक्षकांनी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट कृष्णा व राधा नुसार नर्सरीमधून सर्वोत्कृष्ट कृष्णा म्हणून प्राहिल पाटील या चिमुकल्याच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा मान बहाल करण्यात आला. नर्सरीची सर्वोत्कृष्ट राधा मनस्वी चौडेकर, एल केजी मधून बेस्ट कृष्णा राजवीर गोपनर तर बेस्ट राधा प्रीयांशी जमदाडे , युकेजी मधून संगमेश्वर राठोड हा बेस्ट कृष्णा तर श्रुती श्रीमंगले बेस्ट राधा , पहिल्या वर्गातून रुद्र गजानन पेड बेस्ट कृष्णा तर श्रेया श्रीमंगले बेस्ट राधा इयता दुसरीतून रितेश गजानन जमदाडे हा बेस्ट कृष्णा तर रोहिणी माडावाड ही बेस्ट राधा , इयता तिसरी मधून वेदांत गायकवाड हा बेस्ट कृष्णा तर ईश्वरी काळे ही बेस्ट राधा , इयता चौथी मधून दिपक मस्कले हा बेस्ट कृष्णा तर रेवा गायकवाड ही बेस्ट राधा ठरली आहे. 

श्रीकृष्ण गोकूळ अष्टमी निमित्त आयोजित बेस्ट राधा व बेस्ट कृष्णा स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक ज्ञानोबा जोगदंड , सौ. शकुंतलाबाई जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जाधव सर उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्पर्धा परिक्षणात वेशभूषा , स्पष्टीकरण व सादरीकरण आदी बाबीवर प्रत्येकी ५ प्रमाणे गुण ठेवून पारदर्शक व मुलाखतवजा अल्पपरिचया सह माहिती विचारात घेण्यात आली. अधूनमधून स्पर्धेदरम्यान राधा कृष्ण गीतावर नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख सायराबानू मॅडम यांनी केले तर सौ. शकुंतला गीते मॅडम यांनी सुंदर बहारदार असे सुत्रसंचलन केले . संगीत विशारद संगीतशिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी गायिलेल्या राधाकृष्ण गवळीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले. 

दहीहंडीतील कालाप्रसादाचा सर्वांनी आस्वाद घेतला. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वातेसाठी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केल्यामुळे व विद्यार्थी -पालकाच्या उदंड प्रतिसाद व सहभागामुळे सदरील कार्यक्रम यशस्वी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)