स्वा.रा.ती. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन समितीवर डॉ गोविंद नांदेडे

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

       स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि  विस्तार शिक्षण या विद्यापीठाच्या  अत्यंत महत्त्वपूर्ण समितीवर  राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती माननीय  कुलपती यांच्या पूर्व मान्यतेने कुलगुरू डॉ  उध्दवराव भोसले यांनी  केली आहे. 

     विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जनसामान्यांना आजीवन शिक्षणाची प्रेरणा आणि संधी देऊन मानवी जीवन अधिकाधिक समृध्द , संपन्न आणि  सर्वांग परिपूर्ण करणे हे  या  आजीवन अध्ययन आणि विस्तार शिक्षण या विभागाचे मुख्य ध्येय आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 2016  उपनियम 45 (3) (d) अनुसार करण्यात आली आहे. समाजाचा जीवन स्तर उंचावण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिक, व्यावसायिक  आणि सर्वच समाज घटकांच्या  कौशल्य, प्रतिभा , आणि ज्ञान  संवर्धनासाठी  विविध मार्गाने  प्रयत्न करणे या समितीचे मुख्य ध्येय आहे. 

    पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांचा शिक्षण क्षेत्रातील समृध्द अनुभव आणि त्यांचे  आजीवन ज्ञानार्जन यामुळे त्यांच्या  निवडीचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.  प्राथमिक शिक्षक ते राज्याचे शिक्षण संचालक  असा विलक्षण प्रेरणादायी प्रवास  असलेल्या नांदेडे यांचे अध्ययन  अजूनही चालू  आहे. नांदेडे  अनेक सुवर्ण पदकांसह राज्य आणि राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आहेत. गुणवत्तापूर्ण ग्रामीण  शिक्षण हा त्यांच्या ध्यासाचा  विषय आहे.  त्यांच्या या नियुक्तीचे  लक्ष्यवेध चे अध्यक्ष आणि पूर्व सनदी आधिकरी एकनाथ उर्फ अनिल मोरे, मराठा सेवासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, उपमुकाअ शिवाजीराव कपाळे , डॉ प्रा. हनुमंत भोपाळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिवा कांबळे, प्रेरक वक्ते शिवाजी राजे बाभळीकर, कवी जगन शेळके, राजमुद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगमेश्वर लांडगे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)