संच मान्यतेबाबत महत्त्वाचे पत्र निर्गमित

शालेयवृत्त सेवा
0



तांत्रिक कारणास्तव प्रलंबित संच मान्यता २०२२-२३ बाबत अपडेट


दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पटापैकी ज्या शाळेची आधार वैधता ८५ टक्के पेक्षा जास्त झालेली आहे अशाच शाळांच्या सन २०२२ २३ च्या संच मान्यता जनरेट करण्यात आलेल्या आहेत तसेच जनरेट करण्यात आलेल्या संचमान्यतांचे वितरण करण्यास देखील सूचित करण्यात आलेले होते. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी सदर संच मान्यतेचे वितरण देखील केलेले असेल.

ज्या शाळेची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पटापैकी विद्यार्थ्यांची आधार वैधता ८५ टक्के पेक्षा कमी आहे त्या शाळेच्या संच मान्यता जनरेट करण्यात आलेले नाहीत. त्या शाळेची सन २०२२ - २३ ची संच मान्यता प्रलंबित आहे. सदर शाळा सोडून आपल्या विभागातील ज्या शाळांची संच मान्यता खालील तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असतील तर दिनांक ०२ ऑगस्ट, २०२३ पर्यंत संच मान्यता सन २०२२-२३ आढावा या व्हाट्सअप ग्रुपवर संदर तांत्रिक कारणाचे पुरावे देऊन सदर तांत्रिक अडचण दूर करून घेऊन तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असलेल्या संच मान्यता जनरेट करून घ्याव्यात. संच मान्यता प्रलंबित असण्याची काही तांत्रिक कारणे

१. शाळेची चेंज मॅनेजमेंट झालेली आहे परंतु पोस्ट शिफ्ट न केल्याने संचमान्यतेमध्ये मंजूर पद आलेले नसतील

२. एड पोस्ट सुविधा नसल्याने प्रलंबित

३. संच मान्यतेमध्ये गतवर्षी पद आहे व पुढील वर्षी विद्यार्थी असताना मंजूर पद ० आलेले आहे.

४. मॅनेजमेंट, मिडीयम व कॅटेगिरी मिसमॅचमुळे संच मान्यता Blank आलेली आहे.

५. स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी असताना देखील स्टुडन्ट पेंडिंग अॅट पोर्टल या कारणास्तव प्रलंबित संच मान्यता

६. प्लिज जनरेट एस एम ऑन डायरेक्टर ऑर डेप्युटी डायरेक्टर लॉगिन या कारणास्तव प्रलंबित संच मान्यता

७. इतर काही तांत्रिक कारणास्तव प्रलंबित संच मान्यता आपल्या विभागातील उपरोक्त काही तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असलेल्या संच मान्यतेचा शोध घेऊन सदर शाळेच्या संच मान्यता दिनांक ०२ ऑगस्ट, २०२३ पर्यंत जनरेट करून घ्याव्यात अन्यथा सदर शाळेच्या प्रलंबित संच मान्यतेची जबाबदारी आपली असेल याची नोंद घेण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)