जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे स्मार्ट क्लास रूमचे शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या हस्ते उद्घाटन..

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि इंग्लिश लँग्वेज इम्प्रुवमेंट प्रोजेक्ट (इलिप), वन डे सायंन्स एक्झीभिशन,  प्रश्न मंजुषा यांसह  विविध सहशालेय  उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे एका नविन उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ.सविता बिरगे यांच्या हस्ते स्मार्ट क्लास रुमचे उद्घाटन झाले. यावेळी माध्यमिकचे प्रभारी अधिकारी दिलीप बनसोडे,  कृष्णा खोरे,  सरपंच गणपत राठोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल गिरी, उपसरपंच भोसले, मुख्याध्यापक सुरेश बादशहा, प्रकल्प संचालक डॉ. हेमंत कार्ले आदींची उपस्थिती होती. 

    वाघी येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मध्ये हा नविन उपक्रम म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांची अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व प्रभावी करणारी आणि डिजीटल जगाशी ओळख आणि दोस्ती वाढविणारी आहे. यासाठीच  उपक्रमशील राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक डॉ. हेमंत कार्ले यांनी पुढाकार घेऊन एचपी अल्फा डिजीटल सर्व्हिसेस  या संस्थेकडून आयसीडी व स्पेक्ट्रम सर्व्हिसेस या संस्थेकडून मिळालेल्या स्मार्ट बोर्ड व शाळेकडील  प्रोजेक्टर च्या मदतीने व जवळपास ४० हजार रुपयांच्या लोकवर्गणीतून स्मार्ट क्लास रूमची उभारणी करण्यात आली आहे.

          विविध अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर  इन्सटाॅल असलेल्या  डिजीटल साधनांचा वापर योग्य केल्यास विद्यार्थ्यांच शिकणं रंजक आणि फलदायी होऊ शकते.. शिक्षकांच अध्यापन प्रभावी, मनोरंजक आणि आनंददायी होते. विद्यार्थी नव्या डिजीटल जगाशी जोडले जातील, असा विश्वास डॉ. हेमंत कार्ले यांनी व्यक्त केला. स्मार्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्मार्ट क्लास रूमचा वापर करा आणि स्मार्ट व्हा असा संदेश डॉ.सविता बिरगे यांनी दिला.  यावेळी माजी शिक्षिका शांता आघाव व रामदास अलकटवार आणि  गणिताचे शिक्षक विठ्ठल पवार यांचा दिलेल्या योगदानाबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रलोभ कुलकर्णी, श्रीधर जोशी, राजकुमार गोटे, जयश्री वडगावकर,वि.रा.शिंदे, डी.आर.होणराव व्ही.एन.झोळगे सह विद्यार्थी - पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)