राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पीएचडी नेटसेट झालेल्या शिक्षकांना देणार वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती

शालेयवृत्त सेवा
0

  



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न निर्माण झाल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पीएचडी नेटसेट झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये सामावून घेण्याबाबतचे पत्र निर्गमीत झाल्याने पात्राधारक शिक्षकांत आशा पल्लवित झाल्या आहेत.

     

संदर्भातील शासन पत्राने सर्व जिल्हा परिषद कार्याकडून मागविण्यात आलेली माहिती शासनास मिळाली नसल्याने सदरची बाब ही विधानमंडळ कामकाजाप्रती दुर्लक्षित असणारी असून ही गंभीर बाब असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. तरी सदर विधानसभेत तारांकित प्रश्न संदर्भात संदर्भातील शासन पत्रानव्हे मागविण्यात आलेली माहिती आपल्या अधिनस्त जिल्हा परिषद कार्याकडून प्राप्त करून ती एकत्रित रित्या शासनासपुरुलोखित मेल आयडीवर उपलब्ध करून देण्याचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या पत्रानव्हे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. लवकरच यावर कारवाई होऊन पीएचडी नेट सेट प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकारी पदवर नियुक्ती मिळण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)