जपानी शिक्षक जेंव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवतात . .
सातारा (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विजयनगर (पर्यंती ) हि सातत्याने आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नावारूपाला आली आहे व त्यामुळेच म्हसवड सारख्या शहरातून गाडी भरून विद्यार्थी या ग्रामीण भागातील जि प च्या शाळेत प्रवेश घेत आहेत व काहीजणांना प्रवेश मिळाला नाही.आणि बुधवारी चक्क जपान या प्रगत देशातील शिष्टमंडळ या शाळेतील अभिनव उपक्रम व जपानी भाषेला अधिक साह्य करणे साठी चक्क शाळेत येवून विद्यार्थ्यासोबत ३ तास वेळ घालवला.मुख्याध्यापक बालाजी जाधव सर व उपशिक्षक शेशेबा नरळे यांनी पूर्ण उपक्रम याचे सादरीकरण प्रत्यक्ष करून दाखवले.
मागील वर्षी विजयनगरच्या शाळेतील विद्यार्थी जपानी वाचन लेखन ,बोलणे शिकले होते त्याचा पुढील टप्पा म्हणून जपानी शिष्टमंडळ या ग्रामीण भागातील शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहिले.सर्वप्रथम मुलांनी स्वता बनवलेल्या वारली कलेच्या स्वनिर्मित फ्रेम भेट देवून त्यांचे जपानी भाषेत स्वागत केले. त्यानंतर या शाळेत सुरु असणारे कौशल्य विकासाचे साबण निर्मिती, घड्याळ निर्मिती, खडू निर्मिती,वारली चित्रकला, पियानो वादन, tablet चे प्रात्यक्षिक,धनुर्विद्या याचे प्रात्यक्षिक जपानी पाहुण्यांना दाखवले हे पाहून श्री. तोमोनरी कुरोदा सर हे जपानी पाहुणे खूप आश्चर्य चकित झाले व सर्व त्यांनी नोंदी करून मोबाईल मध्ये शूट सुद्धा करून घेतले व मुलांना शबासाकी दिल्या.
यानंतर मुख्य जपानी भाषेचे सादरीकरण सुरु झाले यामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थी समोर येवून त्यांना जपानी भाषेतून विविध सादरीकरण करून दाखवले ते पाहून सोबत आलेले सुहास मते, हुनुरकर यांनी मुलांचे कौतुक केले.त्यानंतर मते सर यांनी मुलांना प्रत्यक्ष जपानी कसे शिकावे हे हसत खेळत शिकवले. त्यांनतर जपानी असणाऱ्या कुरोदा सर यांनी मुलांना जपानी गाणे शिकवले, जपानी अवयव, कृतीसह नाचून हातीचे, व इतर २ गाणे शिकवले.जपान व भारत यामध्ये काय सारखे आहे तसेच आपण जपानकडून काय काय शिकू शकतो याही गोष्टी त्यांनी जपानी भाषेतून सांगितल्या.कुरोदा सर यांनी जपानी लोक कसे जेवण करतात याचे प्रत्येक विद्यार्थ्या समोर जावून प्रात्यक्षिक दाखवले, जपानी शेती कशी असेते, तिथल्या शाळा कशा आहेत, दोन्हीतील फरक काय अशा अनेक गोष्टी मुलांना समोर बसून सांगितल्या.त्यांनंतर हुनुरकर madam यांनी जपानी ३ लिपिबद्दल फलकावर शिकवले व JLPT च्या परीक्षा त्याची माहिती, अभ्यास, फायदे हे सर्व मुलांना सांगितले.
जपानी शिक्षक आपल्याला वर्गात येवून शिकवत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव अशा ग्रामीण भागातील जि प च्या शाळेतील गोर गरीबाच्या मुलांना अनुभवायला मिळाला हि त्यांच्या साठी मोठी संधी होती. मुलांनी त्यांनी जपानी भाषेचे पुस्तके व जपानी पेन भेट दिले.त्यामुळे मुले हुरळून गेली.व भविष्यात जपान सारख्या प्रगत देशात आपणास कसे जाता येईल असे प्रश्न विचारताच या भाषेवर प्रभुत्व मिळवल्यावर तुम्हाला खूप मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे कुरोदा सर यांनी मुलांना आवाहन केले.सर्व पालक विद्यार्थी या जपानी शिक्षकाला वर्गात पाहून खूप आनंदित झाले. व मुख्याध्यापक बालाजी जाधव सर व उपशिक्षक शेशेबा नरळे सर यांचे सर्वांनी कौतुक केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .