अतिवृष्टीमुळे उदया २२ जुलै २०२३ (शनिवारी ) पण नांदेड जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहणार..

शालेयवृत्त सेवा
0

 



 शाळांना उद्याही सुट्टी जाहीर  : २२ जुलै ( शनिवार )


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत असून भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार २१ ( शुक्रवार ) सुट्टी दिली होती. अजूनही पाऊसाची संततधार सुरूच असल्याने २२ जुलै २०२३ ( शनिवार ) रोजी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या बाबीचा विचार करता नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा महाविद्यालये यांना 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे पत्र शिक्षणाधिकारी नांदेड यांनी काढले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)