पाथरड संकुलाची पहिली शिक्षण परिषद उमरी जहागीर शाळेत उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले यांनी ICT लॅबचे केले उद्घाटन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागीर ,केंद्र पाथरड शाळेमध्ये पाथरड संकुलाची पहिली शिक्षण परिषद घेण्यात आली.

शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भारताचे थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती ,भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम साहेब, यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून परिषदेची सुरुवात करण्यात आली. 

श्रीमती आलोने मॅडम यांनी सुमधुर असे प्रार्थना गीत गायन केले. आणि पहिल्या सत्राचे सुंदर संचालन केले. शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उमरी जहागीर चे अध्यक्ष श्री आनंदरावजी गुडमूडके साहेब ,प्रमुख पाहुणे म्हणून उमरी गावच्या सरपंच ताई चे प्रतिनिधी म्हणून श्री सदाशिवरावजी अमृते, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, व सदस्य श्री बाबाराव काळबांडे श्री सुरेश अमृते, श्री अमोल अमृते. श्रीमती रंजनाताई पुंडलिकराव खानजोडे उपस्थीत होते.

परिषदे च्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून हदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री किशनरावजी फोले साहेब,यांनी तामसा संकुलाचे केंद्रप्रमुख श्री निमलवाड साहेब पाथरड संकुलाचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री केशव टिब्बे साहेब उपस्थीत होते.



आदर्श शाळा उमरी जहागीर शाळेचे मुख्याध्यापक श्री दवणे सर ,घोगरी शाळेचे मुख्याध्यापक श्री कसबे सर, शिवपुरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाचपोर मॅडम, आणि कंजारा शाळेचे मुख्याध्यापक श्री केंद्रे सर, व अंतर्गत शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षीका वृंद उपस्थीत होते.

अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका यांचा अधिक मास निमित्त शाल, टोपी आणि स्वामी विवेकानंदांचे विचार भेट देऊन सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर श्री फोले साहेब यांनी शासनाच्या विवीध स्पर्धा परीक्षा NMMS, नवोदय, स्कॉलरशिप योजना, विविध विद्यार्थि लाभाच्या, योजना, अध्ययनस्तर, v school याबद्दल मार्गदर्शन केले .  यानंतर माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच प्रतिनिधी यांच्या उपस्थित मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये उमरी ज.शाळेतील ICT लॅब चे उद्घाटन करण्यात आले.

सुलभक म्हणून श्री बैनवाड सर, श्री गोविंदपूरे सर, श्री तेलंग सर आणि श्री जाधव सर होते. यांनी विद्याप्रवेश, एकात्मिक पाठ्यपुस्तक, अध्यय स्तर निश्चिती, सेतू अभ्यासक्रम निपुण भारत अभियान,v school याबद्दल स्कूल असे मार्गदर्शन केले.

परिषदेच्या शेवटच्या सत्रात यानंतर उपस्थीत सर्व मान्यवर यांनी अधिक मास निमित्त गोड धोंडे आणि सुरुची जेवणाचा आनंद घेतला. यावेळही कुणाला सासरची तर कुणा महिला भगिनींना माहेरची आठवण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सकाळच्या सत्रात ही शाळेत उपस्थित सर्व विध्यार्थी यांना शालेय पोषण आहारासोबत धोंडे अन्न पदार्थ यांचा आस्वाद घेतला.

अशा तऱ्हेने या परिषदेला निसर्गाने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला धो धो पाऊस कोसळत असताना सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आणि अधिकारी वर्ग यांनी उमरी जहागीरच्या सर्व शिक्षकांना प्रोत्साहन दिले. चिखल पाणी पावसामुळे येण्या-जाण्याला अडथळा आला तरी त्यांनी गोड मानून शिक्षण परिषद यशस्वी केली. सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य केले. याबद्दल जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागिर तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करून शिक्षण परिषदेचे सांगता करण्यात आली.

या परिषदेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व माझे सहकारी श्री अरविंद सूर्यवंशी सर, श्री सुनील मोरे सर, श्री ओम प्रकाश सूर्यवंशी सर, श्री जेडी सूर्यवंशी सर, श्री माधव जाधव सर, श्री लोकेश मस्के सर, श्रीमती फुले मॅडम, श्रीमती वडजे मॅडम, श्रीमती आलोने मॅडम आणि शालेय पोषण आहार कर्मचारी श्री सुभाष आलेवाड व सौ रंजनाबाई आलेवाड, सौ सुशिलाबाई अवधूते, श्री सखाराम मामा खानजोडे, श्री बाळू लगड, श्री गंगाधर गुडमुडके ऑटो वाले स्वयंपाकी श्री डोरले मामा व मामी, सहभाग घेणारे सातवी व आठव्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी ,ज्ञात अज्ञात सर्वांचे, शाळाप्रमुख सोनबा दवणे ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागीर यांनी ऋण व्यक्त केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)