बदलीत सूट घेतली, आता होणार सेवापुस्तकात नोंद सीईओंचा आदेश: सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना, सेवापुस्तकाची प्रत मागवणार !

शालेयवृत्त सेवा
0

 



मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आदेश !


अहमदनगर ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेतील यांची होणार सेवापुस्तकात नोंद पक्षाघाताने आजारी कर्मचारी,अपंग कर्मचारी का? याबाबत साशंकता आहे. किंवा घटस्फोटिता यासंदर्भात जिल्हा परिषदेत प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. जे कर्मचारी प्रमाणपत्र पडताळणीत दोषी असतील त्यांच्यावर निलंबनासह बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. 

बदल्यांमध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करून बदल्यांमध्ये सूट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा बसावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीत सूट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची नोंद सेवापुस्तकात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तसा आदेश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना काढला असून, नोंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या सेवापुस्तकाच्या पानाची सत्यप्रत बदल्यांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी संबंधित खातेप्रमुखाकडे सादर दिव्यांग, घटस्फोटिता, परित्यक्ता करण्यास बजावले आहे.


मूत्रपिंडाचा आजार असलेले , कॅन्सरने आजारी आजी, माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी विधवा कर्मचारी कुमारिका, परितक्त्या, घटस्फोटिता कर्मचारी तसेच मुले मतिमंद अथवा गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची प्रमाणपत्रे सादर करत बदलीत सवलत मिळवली आहे. मात्र, ही सर्व प्रमाणपत्रे वैध आहेत.

दुसरीकडे बदलीत सवलत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची किंवा त्यांच्या स्वयंघोषणापत्राची नौद संबंधितांच्या मूळ सेवा पुस्तकात घेण्यात येणार आहे. जेणेकरून बोगसगिरीस आळा बसणार आहे. काही महिला बनावट परित्यक्ता असल्याचे प्रमाणपत्र देतात. त्याआधारे पूर्ण सेवेत बदलीत लाभ घेतात; परंतु दुसरीकडे आपल्या पतीसोबत राहत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. 

परित्यक्ता किंवा घटस्फोटिता असल्याची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसल्याने त्यांचा पतीच कायदेशीर वारस ठरतो. त्यालाच तिचे सर्व लाभ मिळतात; परंतु आता सेवापुस्तकात परित्यक्ता किंवा घटस्फोटिता, अशी नोंद असेल, तर पतीला पत्नीचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)