शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा..विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही कपिल पाटील यांच्या मागणीला पाठिंबा.

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विधान परिषदेत घणाघात. !


(राजकीय विश्लेषक उदय नरे यानी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सभागृहात  मांडलेल्या शिक्षकांच्या समस्येवर घेतलेल्या प्रश्नांचा खास वृत्तांत )


शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सभागृहातील चर्चेवर शिक्षण क्षेत्रात खळबळ..


मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची दखल घेत कारवाईसह बुधवारी लक्षवेधीची सुचनेची विनंती..


विधान परिषद उपसभापती निलमताई गोरे म्हणाल्या बाब गंभीर! सभागृहातील सर्वपक्षीय आमदारांच्या मतेही गंभीर विषय. 

शिक्षणाधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबद्दल व भ्रष्टाचार बद्दल सभागृहाच्या दोन्ही सभागृहात प्रकरण गाजतात परंतु कारभार तसाच चालू आहे. मुंबईत भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. उत्तर मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षक उर्मिला पारधे त्याच्या कारभाराबद्दल विधान सभेत आमदार अबु आझमी यांनी तक्रार केली आहे. 


कोण कोणत्या प्रकरणात पैसे घेतले जातात याची यादी मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत जाहीर केली यांनी खळबळ उडवून दिली आहे.  तक्रारी करूनही मान्यता द्यायची नाही.  शालार्थ आयडी द्यायची नाही. अनुकंपा प्रकरणात नियुक्ती द्यायच्या नाहीत. 

निवृत शिक्षकांचे पीएफ आणि पेंशन सुरू करायची नाही. वैद्यकीय बिलांची प्रतिपुरती करायची नाही. ती लांबवत ठेवायची. संचमान्यता करायच्या नाहीत. पगार पत्रक काढून देण्यासाठी पैसे घेतले जातात. न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुध्दा वेळकाढू पणा करून शिक्षकांना वेठीस धरणे. मुख्याध्यापक व शिक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिक्षक पुरस्कार नामांकन करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येत आहे. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात. शालार्थ आयडी द्यायची आहे पैसे द्या या साठी एक एजंट नेमला गेला आहे असा गंभीर आरोप आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात केला आहे. 

अबुआसीम आझमी यांच्या संस्थेच्या कागदपुर्ती करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली अशी माहिती आमदारांनी विधान सभेत दिली. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून तात्काळ हटवण्यात यावे व नंतर चौकशी करावी अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात  केली आहे. भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे याप्रसंगी सादर केले. पगार काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते या प्रकरणी फारच आक्रमक झालेल्या आमदारांनी प्रथम अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर पदावरून हटवून चौकशी केली पाहिजे तरच न्याय मिळेल असे सभागृहात ठणकावून सांगितले. 

अधिकारी वर्ग नियुक्तीसाठी मलिदा देऊन नियुक्त होतात असा दावाही शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात केला. बुधवारी सभागृहात शिक्षणासारख्या पवित्र क्षैत्रातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात लक्षवेधीत चर्चा होणार आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात लक्ष वेधलेल्या या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते याकडे सभागृहा प्रमाणे सर्वसामान्य जनता तसेच शिक्षकांचेही लक्ष वेधले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)