शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ करिता नावनोंदणी व व्हिडीओ अपलोड करा

शालेयवृत्त सेवा
0



शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ करिता नावनोंदणी व व्हिडीओ अपलोड करणेबाबत...

पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ बाबत आयोजन, सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सोपविण्यात आलेले आहेत. यानुसार २०२३-२४ दरम्यान शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ साठी नियोजन करण्यात आलेले आहे.

सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांचे कडून आवेदन स्वीकारण्याचे प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे.

यानुसार ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत

https://scertmaha.ac.in/vcomp2023/ 

ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरील लिंकवर स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांनी नोंदणी करावयाची आहे. सदर स्पर्धेसाठी आवश्यक अटी:- (कृपया अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)