लातूर ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा तीन वर्षाचा काळ आपल्या सहकार्यामुळे अविस्मरणीय ठरला. कोविड व तदनंतर ग्रामीण भागातील वाड्या, वस्ती व तांड्यापर्यंत पोहोचून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. यामध्ये सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, माझे सर्व सहकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संघटना यांचे भरभरून प्रेम व सहकार्य या काळात मला मिळाले.
या तीन वर्षातील सर्व यशात या सर्वांचा सिंहाचा वाटा असून, माझा खारीचा सहभाग होता. समस्त महिला वर्गाने तर त्यांच्या रेशीमगाठीत मला आयुष्यभर बांधून टाकले आहे.
आपले ऋणानुबंध, सहकार्य व संपूर्ण टीमचा विश्वास या जोरावर अनेक आव्हानात्मक भूमिका पार पाडत असताना अनेकदा यशाचे तुरे शिरपेचात रोवण्याची संधी प्राप्त झाली.आपला स्नेह, आपुलकी व ऋणानुबंधाची शिदोरी ही आयुष्यभराचा ठेवा म्हणून माझ्या सोबत राहील.
नांदेड मधील सर्व पत्रकार, डॉक्टर्स, साहित्यिक, वकील, समाज घटकातील विविध नामांकित संस्था व व्यक्ती यांचे आभार मानण्यापेक्षा मी आपल्या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छिते.
जिल्हाधिकारी लातूर या पदावर माझी बदली झाली असली तरी आपला स्नेह व शुभेच्छा कायम राहतील या खात्रीसह अलविदा! धन्यवाद...
- वर्षा ठाकूर- घुगे ( जिल्हाधिकारी लातूर )
( fb वरून )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .