प्रेरणा परीक्षेसाठी शिक्षक उत्साहित.. 30 व 31 जुलैला होणार परीक्षा

शालेयवृत्त सेवा
0

 



छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :

मराठवाड्यातील जिल्हा परिषदेसह 100% अनुदानित शाळेतील शिक्षकांची प्रेरणापरीक्षा 30 एप्रिल आणि 31 जुलै रोजी घेण्यात येणार आहे तसे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरत चालल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी अनुदान शाळांमध्ये शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षा एक तासाची राहणार असून त्यात 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी गुण वजा करण्यात येणार आहे. शिक्षकाचे विषय ज्ञान वृद्धिगत व्हावे त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी अध्यावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांचे क्षमता अधिक दृढ आणि विकसित व्हावी या हेतूने प्रेरणापेक्षा घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


परीक्षा वेळापत्रक :

शनिवार ( 30 जुलै ) : सकाळी  10 ते 11 भौतिकशास्त्र / 11:30 ते 12:30 रसायनशास्त्र / 01 ते 02 जीवशास्त्र 

रविवारी ( 31 जुलै ) सकाळी १० ते ११ गणित / 11.30 ते 12.30 इंग्रजी / 01 ते 02 इतिहास व भूगोल.


शिक्षक संघटनाचा विरोध कायम -

शिक्षकांना दिलेल्या प्रशिक्षणामधून आतापर्यंत त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले हे यावरून समजणार आहे येत्या परीक्षेसाठी अनेक शिक्षकांनी संमती दर्शवले आहे मात्र शिक्षक संघटनेने या परीक्षेला विरोध दर्शवला आहे. परीक्षा घेण्यामागील निर्णय स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परीक्षेला विरोध असल्याचे निवेदन देखील त्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)