महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिकृत वेबसाईट, यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम, ट्विटरचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन...!!

शालेयवृत्त सेवा
0





महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत ऐतिहासिक व यशस्वी भेट संपन्न...!! 


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची दिनांक 26 जुलै 2023 वार बुधवार रोजी शिक्षक संघाचे पंचप्राण आदरणीय श्री.संभाजीराव थोरात तात्यासाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत विशेष बैठक वर्षा या सरकारी निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची अधिकृत वेबसाईट, युट्युब चॅनेल, फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम सर्वच सोशल मीडिया अकाउंट चे उद्घाटन करण्यात आले. 


याप्रसंगी शिक्षक संघाचे आदरणीय नेतृत्व श्री. संभाजीराव थोरात तात्यासाहेब , राज्याध्यक्ष श्री.अंबादास वाजे सर, राष्ट्रीय महासचिव श्री.बाळासाहेब झावरे सर, श्री.मधुकर काठोळे सर, राज्य सरचिटणीस श्री. आबासाहेब जगताप सर, राज्य कोषाध्यक्ष श्री.उत्तमराव वायाळ सर, श्री.तात्यासाहेब यादव, राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री.सचिन डिंबळे सर , सरचिटणीस श्री.संजय चेळेकर सर, राज्य  व राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी व राज्यभरातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.बाळासाहेब झावरे सर यांनी प्रभावी पणे केले. सूत्रसंचलन श्री. आबासाहेब जगताप सर यांनी केले. शिक्षक नेते श्री.संभाजीराव थोरात तात्या यांनी नेहमीच्याच प्रभावी स्टाईलमध्ये शिक्षकांचे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रभावीपणे मांडले. श्री.अंबादास वाजे सर, श्री.आबासाहेब जगताप सर, श्री सचिन डिंबळे सर व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व राज्यस्तरावरील पुढील प्रश्न अभ्यासपूर्वक मांडले.


1] प्रस्तावित शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबवून तीन वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना पुन्हा एकदा बदली अर्ज करण्याची संधी मिळावी. गैरसोयीत व पती-पत्नी विभक्त असणाऱ्या शिक्षकांना स्व-जिल्ह्यात व सोयीने बदली करण्याची संधी मिळावी.

2] अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया चालू ठेवून 2018-19 मध्ये व त्यानंतरही यावर्षी पर्यंत झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये विस्थापित झालेल्यांना, गैरसोयीत बदली झालेल्यांना, पती-पत्नी गैरसोयीत असणाऱ्यांना, बदलीची संधी मिळावी. लेडीज फॉर अनफिट, एकल शिक्षक, पूर्वीच्या अवघड शाळा सुगम झाल्यास अवघड सेवाग्राह्य धरण्यात यावी. रँडम स्थापित झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे. जिल्हा अंतर्गत बदली मध्ये सहाव्या टप्प्यात बदली झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात.

3] प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे जुन्या पेन्शन साठी समिती गठीत केली आहे. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन 01 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी.

4] केंद्रप्रमुख पदे लवकरात लवकर शंभर टक्के शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधीन राहून प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात यावी. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षांसाठी व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या सर्व शिक्षकांना परीक्षेसाठी संधी देण्यात यावी. केंद्रप्रमुख परीक्षेसाठी 50 वर्षे वयाची व 50 टक्के गुणांची अट शिथिल करावी. केंद्रप्रमुख पदोन्नती मध्ये विषयवार विचार न करता सर्व शिक्षकांना समान संधी मिळावी.

4] मुख्यालय राहण्याची अट रद्द करण्यात यावी.

5]वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी.

6] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना  १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.

7] बारावी सायन्स पदवीधरांना पदावनत करण्यासाठीचे पत्र रद्द करून तीन वर्ष मुदत देऊन बी.एस.सी पदवी प्राप्त करण्याची संधी मिळावी.

8] सातव्या वेतन आयोगाचा दुसरा, तिसरा, चौथा हप्ता तसेच जीपीएफ व मेडिकल बिले लवकरात लवकर मिळण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे.

9] सेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युटी, पेन्शन विक्री, मेडिकल बिले, वेतन आयोग हप्ते लवकरात लवकर मिळण्यासाठी प्राधान्याने अनुदान उपलब्ध करून द्यावे.

10] 100% पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, त्यामध्ये भेदभाव करण्यात येऊ नये.


11] एम. एस.सी. आय. टी बाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.

12]उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त M.A, M. Phil, Ph.D केलेल्या शिक्षकांना पदोन्नती, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवेकरिता पात्र होण्यासाठी जिल्हा परिषद  जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 च्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी.

13] 6 ते 14 वयोगटातील सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना शासनाने दरवर्षी मोफत गणवेश द्यावा.

14] जिल्हा परिषद सेवेतील समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांच्या पदासाठी कायम संरक्षण देण्यात यावे.

15]जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी केलेल्या संपकालीन कालावधीत मंजूर असाधारण रजा ऐवजी त्या रजा अर्जित रजा म्हणून मंजूर करण्यात याव्यात.

16] 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी देण्यात यावी.

17] शिक्षक आमदार निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव देऊन मतदान हक्क देण्यात यावा.

18]नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका यामधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे ब, क, ड नगरपालिका व ड वर्ग महानगरपालिकेतील प्राथमिक शिक्षकांचे शंभर टक्के वेतन राज्य शासनाद्वारे करणे.

19]राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार होण्यासाठी, प्राथमिक शिक्षकांची कामे राज्य शासनाने आदेशित केलेल्या विहित कालावधीतच पूर्ण होण्यासाठी व ती न झाल्यास प्रशासनावर कारवाईचा बडगा उभारण्याची तरतूद असलेला सेवा हमी कायदा लागू करणे.

20]नगर विकास खात्याच्या 16 फेब्रुवारी 2021 च्या बदली जीआर मधील दहा नंबरची अट रद्द करणे.


21]पुणे महानगरपालिकेत कार्यरत 93 रजा मुदत शिक्षण सेवकांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करणे.

22] जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेलाच होण्यासंबंधीचा आदेश निर्गमित करणे.

23]बारा वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळताना अत्यल्प लाभ मिळत असून त्यामध्ये वेतन त्रुटी सुधारणा व्हावी.


24]पालघर जिल्ह्यामध्ये एकस्तर लागू करावा. याच जिल्ह्यात विभाजनानंतर पदोन्नती झालेली नाही ती व्हावी. आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे. हे विषय अत्यंत अभ्यासपुर्ण पध्दतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री माननीय नामदार श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासमोर प्रभावीपणे मांडले. मा.मुख्यमंत्री महोदयांनी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित विषयाचे राज्य शासनाचे जी.आर काढण्यासाठी मीटिंगमध्येच संबंधित अधिकाऱ्याना आदेशित केले. अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ऐतिहासिक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वीरित्या पार पडली. जय शिक्षक संघ...!!


मा.संभाजीराव थोरात तात्या नेते /मधुकर काटोळे-अध्यक्ष, राज्य समन्वय समिती /अंबादास वाजे-राज्याध्यक्ष /म.ज.मोरे-कार्यकारी अध्यक्ष 'पोपटराव सूर्यवंशी-कार्याध्यक्ष /आबासाहेब जगताप-सरचिटणीस /उत्तमराव वायाळ-कोषाध्यक्ष/ एन.वाय.पाटील-राष्ट्रीय अध्यक्ष /बाळकृष्ण तांबारे-राष्ट्रीय उपाध्यक्ष /बाळासाहेब झावरे-राष्ट्रीय महासचिव /तात्यासाहेब यादव-राष्ट्रीय कार्याध्यक्ष /सचिन डिंबळे-राज्य कार्यकारी अध्यक्ष नपा-मनपा /संजय चेळेकर-राज्य सरचिटणीस नपा-मनपा / स्वाती शिंदे-राज्य महिला आघाडी प्रमुख / लहुजी कांबळे-सल्लागार समिती अध्यक्ष / शरद पवार-कार्याध्यक्ष   नपा-मनपा / सुनील खेलुकर-खजिनदार नपा-मनपा.


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नांदेडचे जीवनराव पाटील वडजे  नेते /नरसिंग सोनटक्के राज्य उपाध्यक्ष /बंडू पाटील भोसले राज्य संघटक /पाराजी पोले विभागीय सरचिटणीस संजय पाटील अंबुरे /  शिक्षक नेते बाबुराव फसमले जिल्हाध्यक्ष /बाबुराव माडगे जिल्हा सचिव /सतीश रघुजीवार जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष /उद्धव पाटील सूर्यवंशी दक्षिण जिल्हा कार्यकारी अध्यक्ष /लक्ष्मणराव अनकाडे उत्तर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष /अण्णाराव गुमनर दक्षिण जिल्हा सरचिटणीस / भगवान गजभारे उत्तर जिल्हा सरचिटणीस /जयश्री भरडे महिला जिल्हा नेत्या /प्रमिला शेनकुडे महिला जिल्हा सरचिटणीस यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)