चोरगाव शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवड..

शालेयवृत्त सेवा
0

 


विद्यार्थ्यांनी घेतला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा अनुभव !

चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोरगाव केंद्र पदमापूर पंचायत समिती चंद्रपूर येथे दिनांक 24 जुलै रोजी देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जसे मतदान यंत्राचा वापर करून निवडणूक घेतली जाते तसा अनुभव देत अँपच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्यात आले. निवडणूक निरीक्षक म्हणून गावच्या सरपंच मा.तृणाली धंदरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्रावण लोनबले मा.दुर्गा देठे वन विभाग कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. 


निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उभे असलेल्या साहिल भास्कर कोकोडे याला 36 मते मिळवून मुख्यमंत्री पदावर निवड झाली त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार अभय अनिल कोकोडे याला 35 मते मिळाली, नयन नितेश चौधरी वर्ग 2 रा याला 24 मते मिळाली तर नोटा ला 3 मते मिळाली. अश्याचप्रकारे उपमुख्यमंत्री पदासाठी राशू विलास वाढई ही 49 मते मिळवून विजयी झाली. अन्य मंत्री पुढीलप्रमाणे आरोग्यमंत्री रुपाली राजू कोटरंगे, सहमंत्री जया जितेंद्र महाडोळे, स्वच्छता मंत्री मयुरी राजहंस कोटरंगे, संगम शरद मोहूर्ले, शिक्षण मंत्री महिमा रवींद्र कोकोडे, श्राव्या रवींद्र वेलादी, उपक्रम मंत्री अभय अनिल कोटरंगे, श्रुतिका श्रावण लोनबले,   क्रीडा मंत्री श्रीकांत मनोज टेकाम, यश सुनील मेश्राम, सांस्कृतिक मंत्री सुहानी कैलास पेंदाम, मान्यता नरेश आऊतकर, पर्यावरण मंत्री निशा नितेश दाते, तेजु योगेश महाडोळे, वाचनालय मंत्री राजनंदिनी शरद गाऊत्रे, आरोशी दिवाकर कावळे, भोजन मंत्री वेदन बंडू कोटरंगे, केतन संदीप महाडोळे, पाणी पुरवठा मंत्री आशिष दिवाकर कावळे, अंकुश ऋषी मेश्राम, अर्थमंत्री कविता संजय मोहूर्ले, ईशिका नरेश आऊतकर यांची सर्वानुमते निवड झाली. 


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिला निंबार्ते, निवडणूक अधिकारी म्हणून हरीश ससनकर, प्रशांत ढवळे, लता मडावी, चंदा जेनेकर यांनी काम पाहिले, जसे त्यांचे पालक मतदान करतात तसे बटन दाबून मतदान करतांना विद्यार्थ्यांना आनंद झाला, शाई लावलेले बोट दाखवत त्यांनी फोटो काढून घेतले, 5 दिवसांपूर्वी निवडणुकीबद्दल मुलांना कल्पना देण्यात आली, उमेदवार व चिन्ह यादी प्रकाशित करण्यात आली, पहिलीपासून सर्वच विद्यार्थ्यांनी उमेदवाराचे नाव व चिन्ह पाहून त्याच्या समोरील निळे बटन दाबून मतदानाचे कर्तव्य पार पाडले, मतदान झाल्यानंतर बीप च्या आवाज त्यांचा उत्साह वाढवत होता. एकूणच ही निवडणूक त्यांना एक नवीन अनुभव देऊन गेली. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)