संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान !
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबतचे परीपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली व त्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाचे परीपत्रक तात्काळ जाहीर केले. मुंबई उपनगर स्काऊटस् सहआयुक्त जितेंद्र महाजन सरांनी मुख्यमंत्री महोदयांनी समयसूचकता दाखवून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थिीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
प्रस्तुत प्रकरणी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पुर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या कार्यकक्षेतील / स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवल्यास उक्तप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे परीपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई.संदीप संगवे यांनी काढले आहे.
शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापक व संस्थाचालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .