नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषदेच्या शाळेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे दरवर्षी शालेय गणवेश म्हणून दोन ड्रेस मोफत वाटप करण्यात येतात.याही वर्षी शासनाने शाळेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना एक मोफत गणवेश देण्यासाठी निधी पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून दिला आहे.
त्या अनुषंगाने पंचायत समिती नांदेड तर्फे देण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय सूचनांचे पालन करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथील सर्वच विद्यार्थ्यांना लोकसहभागाच्या माध्यमातून मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती ने मोफत एक गणवेश उपलब्ध करून दिला आहे. त्याचे वितरण नुकतेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी सपुरे, उपाध्यक्ष मारोती करडीले,समिती सदस्य संदीप मस्के, विठ्ठल गजभारे तसेच ज्योती करडीले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अक्षय ढोके,सहशिक्षक गोपाळ राजेबोईनवाड,मदतनीस द्वारका करडीले,मंगल मस्के इत्यादी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .